शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

विधायक विचार पुढील पिढीला द्यायला हवे : रवींद्र सेनगावकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 18:26 IST

केवळ स्पिकर्सच्या भिंती आणि थयथयाटापेक्षा पुढील ५० वर्षे पुरतील असे विचार आजच्या पिढीला आपण द्यायला हवेत...

पुणे : समाजाला दिशा देण्याचे काम करणारे अनेक कार्यकर्ते गणेशोत्सवातून घडतात. मात्र, आजचे उत्सवाचे स्वरुप बदलत चालले आहे. बदलत्या स्वरुपाला आपण जबाबदार आहोत. केवळ उत्सवातील १० दिवसांपुरते नाही, तर वर्षभर आपण समाजासाठी खूप काही करु शकतो. त्यासोबतच देखाव्यांतून ऐतिहासिक गोष्टींना तंत्रज्ञानाची जोड देऊन चांगला संदेश देणे देखील शक्य आहे. केवळ स्पिकर्सच्या भिंती आणि थयथयाटापेक्षा पुढील ५० वर्षे पुरतील असे विचार आजच्या पिढीला आपण द्यायला हवेत, असे मत दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी व्यक्त केले. शनिपार मंडळ ट्रस्टतर्फे भक्ती गणेशाची सेवा मानवाची असे कार्य केलेल्या गडचिरोली नक्षलग्रस्त भागात केलेले सामाजिक कार्य व गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमधील नोंदीबद्दल उदय जगताप यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. कुमठेकर रस्त्यावरील सेवासदन हायस्कूल मुलींची शाळा येथे झालेल्या कार्यक्रमाला संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद पंडित, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, गोपाळ तिवारी, मंडळाचे शेखर साळुंके, प्रसाद पळसकर, गणेश घोले, संयोजक गणेश शेडगे, गोरख पळसकर यांसह कृष्णा जाधव, संदीप पाषणकर, तुषार जोरी, योगेश फाळके आदी उपस्थित होते. डॉ. देखणे म्हणाले, कार्यकर्ता घडवणारे एकमेव विद्यापीठ गणेशोत्सवाच्या रुपाने उभारले आहे. यासाठी सामाजिक जाणीवही पात्रता असून सच्चा कार्यकर्ता ही मिळणारी पदवी आहे. प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये समाजात सक्रिय व सकारात्मक बदल घडवण्याची ताकद आहे. विकृतीवर प्रकृतीची आणि त्यावर संस्कृतीची मात करण्याचे काम कार्यकर्ते करतात. त्यामुळे गणेशोत्सव नसता तर कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली नसती.प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, सनदशीर मार्गाने गोष्टी मिळाल्या, तर नक्षलवाद किंवा गुन्हेगारी निर्माण होणार नाही. बुलेट नको, बुक हवेही संकल्पना अशा भागांमध्ये राबवायला हवी.उदय जगताप म्हणाले, हात उगारण्यासाठी नाही तर उभारण्यासाठी आहेत, हे ब्रीद अंगीकारुन धनकवडीतील आदर्श मित्र मंडळामार्फत आम्ही काम केले. मंडळ आपल्या खिशातील पैशाने चालवू ही संकल्पना आणून कार्यकर्त्यांना रोजगार देखील उपलब्ध करुन देण्याकरीता पुढाकार घेतला. गडचिरोलीमध्ये देखील चांगले कार्य करणा-या पोलिसांना मदतीसाठी आम्ही गेलो. गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो, ती ओळख पुसण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहेत. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.  

टॅग्स :PuneपुणेGaneshotsavगणेशोत्सवSocialसामाजिक