शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

महारेराकडे नोंदणी झालेल्या बांधकाम प्रकल्पांना गुणवत्ता जाहीर करावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:00 PM

ग्राहकांना बांधकामाच्या दर्जाची खात्री मिळणार

ठळक मुद्देदीड हजार जणांनी जाहीर केली माहिती : महारेरा-क्रेडाई घेणार गुणवत्ता पडताळणी वर्गमहारेरा-क्रेडाई घेणार गुणवत्ता पडताळणी वर्गमेट्रो’तर्फे बांधकाम साईटवरील निरीक्षक अभियंत्यांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू

पुणे : महारेराकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक प्रकल्पाच्या बांधकाम गुणवत्तेची माहिती जाहीर करावी लागणार असून, त्यामुळे ग्राहकांना बांधकामाच्या दर्जाची खात्री मिळेल. त्या पार्श्वभूमीवर सदनिकेच्या बांधकामात उत्तम प्रतीचेच साहित्य वापरले आहे ना, बांधकामाचा दर्जा राखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या, गुणवत्तेची पडताळणी कशी करावी याचे प्रशिक्षण अभियंत्यांना दिले जाणार आहे. ‘महारेरा’च्या मदतीने ‘कुशल क्रेडाई पुणे मेट्रो’तर्फे बांधकाम साईटवरील निरीक्षक अभियंत्यांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. बांधकाम साहित्याची तपासणी कशी करून घ्यावी, तपासणीचे अहवाल कसे पडताळावेत आणि या चाचण्यांच्या निष्कर्षांची माहिती महारेराला कशी पुरवावी यासंबंधीच्या अभ्यासक्रमास ‘राष्ट्रीय बांधकाम कौशल्य विकसन परिषदे’ची (सीएसडीसीआय) मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमाबाबत माहिती देण्यासाठी ‘क्रेडाई पुणे मेट्रो’तर्फे बांधकाम अभियंत्यांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी, प्रमुख तांत्रिक अधिकारी ज्ञानेश्वर हडदरे, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, कुशलचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, कुशलचे सदस्य समीर बेलवलकर, मिलिंद तलाठी, रुपेश बाँठिया, या अभ्यासक्रमातील प्रशिक्षणासाठी साहाय्य करणारे केशव वरखेडकर, उज्ज्वल कुंटे या वेळी उपस्थित होते.ज्या बांधकाम प्रकल्पांची १ डिसेंबर २०१८ नंतर महारेराकडे नोंदणी झाली आहे त्या सर्वांना ‘२-ए’ या विशिष्ट फॉर्ममध्ये बांधकाम साहित्य व बांधकाम पद्धतींच्या दजार्बाबत प्रमाणपत्र जाहीर करावे लागणार आहे. असे ५ हजार प्रकल्प राज्यात सुरू असून, त्यातील दीड हजार ते १६०० प्रकल्पांनी आतापर्यंत हा फॉर्म भरला आहे.चटर्जी म्हणाले, ‘बांधकाम साईटवरील अभियंत्यांसाठीच्या या नवीन अभ्यासक्रमामुळे ते या नियमांचे पालन करण्यासाठी आणखी सक्षम होतील. ‘२-ए’ फॉर्ममध्ये भरली जाणारी माहिती संकेतस्थळावर कुणीही पाहू शकेल. त्यामुळे सदनिका ग्राहकांची बांधकामाच्या दर्जाबद्दलची काळजी दूर होण्यास मदत होईल. त्यांचा विश्वास उंचावेल. 

टॅग्स :PuneपुणेRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017