नगरसेवकांच्या वाॅर्ड स्तरीय निधीतून शहरात ऑक्सिजन प्लांटची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:12 AM2021-04-21T04:12:49+5:302021-04-21T04:12:49+5:30

पुणे : महापालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या वार्डस्तरीय निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये घेऊन, महापालिकेच्यावतीने शहरात दोन आॅक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात ...

Construction of Oxygen Plant in the city with ward level funds of the corporators | नगरसेवकांच्या वाॅर्ड स्तरीय निधीतून शहरात ऑक्सिजन प्लांटची उभारणी

नगरसेवकांच्या वाॅर्ड स्तरीय निधीतून शहरात ऑक्सिजन प्लांटची उभारणी

Next

पुणे : महापालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या वार्डस्तरीय निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये घेऊन, महापालिकेच्यावतीने शहरात दोन आॅक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे़

याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय झाला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रासने यांनी दिली़ नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून सुमारे पाच कोटी रूपयांचे बाणेर येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटल येथे हे दोन प्लांट उभारण्यात येणार आहेत़ यामुळे भविष्यात शहरातील रूग्णालयांना आॅक्सिजनचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घेतली जाईल़

कोरोनाच्या दुसºया लाटेत महापालिकेने आपल्या भांडवली खर्चांमध्ये ३५० कोटी रूपयांच्या रक्कमेची कमी केली असून, हा निधी आवश्यकतेनुसार कोरोना आपत्ती निवारणासाठी खर्च केला जाणार आहे़

दरम्यान आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत पीएमपीएमएलला दरमहा देण्यात येणारी संचलन तूट देण्याबरोबरच, अंबिल ओढ्याच्या सीमा भिंत बांधण्याच्या विषयास मान्यता देण्यात आली आहे़

--------------------

Web Title: Construction of Oxygen Plant in the city with ward level funds of the corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.