शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

बांधकाम मजूर उपेक्षितच, डॉ. नीलम गो-हे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 02:26 IST

राज्याच्या व देशाच्या विविध भागातून पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात रोजगारासाठी सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक लोक बांधकाम कामगार म्हणून काम करीत आहेत. मात्र, त्यातील मोठ्या प्रमाणात काम करणारे लोकांची अधिकृत नोंदणी करण्यात येत नाही.

पुणे : राज्याच्या व देशाच्या विविध भागातून पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात रोजगारासाठी सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक लोक बांधकाम कामगार म्हणून काम करीत आहेत. मात्र, त्यातील मोठ्या प्रमाणात काम करणारे लोकांची अधिकृत नोंदणी करण्यात येत नाही. त्यामुळे त्यांना कोणतीही विपरीत दुर्घटना घडल्यास विमा संरक्षण अथवा कुटुंबियांना देय असलेले आर्थिक लाभ मिळणे दुरापास्त होते. हा विषय सध्या न्यायालयाच्या अखत्यारीत असल्याचे राज्य सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र, अद्याप न्यायालयाकडून याबाबत मार्गदर्शक तत्वे प्राप्त झालेली नाहीत. परिणामी बांधकाम मजुरांची खºया अर्थाने उपेक्षाच होते आहे, अशी खंत शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केली.सिंहगड रस्त्यावर मंगळवारी १७ आॅक्टोबर २०१७ रोजी सेया या इमारतीचे काम सुरू असताना त्याचा काही भाग कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या ठिकाणी गुरुवारी डॉ़ गोºहे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी अनिल पाटील यांच्याकडून तपासाबाबत व जखमी लोकांच्या उपचाराची चौकशी करून माहिती घेतली.नीलम गोºहे म्हणाल्या, बांधकाम व्यवसाय हा सध्या अनेक प्रकारच्या संकटांना समोर जात आहे. असे असतानाही न्यायालय आणि सरकारच्या माध्यमातून आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने या विषयाचा विधीमंडळात पाठपुरावा केला आहे.बांधकामे करीत असताना एका बाजूला मजूर उपलब्ध होत नाहीत, अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे उपलब्ध बांधकाम मजुरांची कोणतीही अधिकृत नोंदणी करण्याची तसदी बांधकाम व्यावसायिक अथवा ठेकेदार घेत नाहीत. या ठिकाणीही मृत झालेल्या कामगारांची कोणतीही नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे.राज्य सरकारच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेच्या खात्यामध्ये बांधकाम उपकरातून तब्बल ४७०० कोटी रक्कम सरकारकडे जमा झाली आहे. या रकमेचे दरमहा व्याज काही कोटींमध्ये सरकारकडे प्राप्त होते. मात्र असे असूनही केवळ २०० कोटी खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम कामगार अथवा इतर असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून घेण्यासाठी कामगार कल्याण विभागाच्या अंतर्गत अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नाहीत.अनेकदा शहरांमध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कामगारांसाठी सुरक्षिततेची कसलीही सुविधा, तातडीची मदत मिळण्यासाठी व्यवस्था उपलब्ध नसते.दुर्घटना घडल्यानंतर जरी न्यायालयामार्फत दोषींना शिक्षा होत असली तरी जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत मात्र फारच तुटपुंजी मिळते. या पार्श्वभूमीवर डॉ. गो-हे यांनी मुख्यमंत्री व कामगारमंत्री यांना दिलेल्या निवेदनात या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, ठेकेदार व बिल्डर यांच्यातील करार आॅनलाईन उपलब्ध व्हावेत आणि कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध करून याबाबतीतली माहिती आॅनलाईन मिळावी, अशा मागण्या केल्या आहेत.या वेळी शिवसेना पदाधिकारी विभागप्रमुख नितीन वाघ, संतोष गोपाळ, मनीष जगदाळे, नीलेश गिरमे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.जखमींना मिळणार योग्य मोबदला...अनेकदा अशा दुर्घटना घडल्यावर जखमी मजुरांना लवकरात लवकर त्यांच्या मूळ गावी परत पाठविले जाते. त्यांच्या कुटुंबियांना किरकोळ रक्कम देऊन त्यांची बोळवण केली गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनेमध्ये पोलीस अधिकारी अनिल पाटील यांनी पुणे व झारखंडमधील कामगार आयुक्तांशी संपर्क करून या मृत व जखमींच्या कुटुंबीयांना योग्य ती आर्थिक मदत करून देण्याच्या उद्देशाने संपर्क साधला आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPuneपुणे