शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Constitution Day : भारतीय संविधानाबाबत तुम्हाला हे माहितीये का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 14:46 IST

26 नाेव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. या दिवसाचे महत्त्व भारताच्या इतिहासात माेठे अाहे.

पुणे : भारतीय लाेकशाहीला जगातील सर्वात माेठी लाेकाशाही म्हणून अाेळखले जाते. भारताने संघराज्य पद्दतीचा अवलंब केला अाहे. 15 अाॅगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा देश एका नवीन संविधानावर, एका नव्या व्यवस्थेवर चालावा यासाठी संविधानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात अाला. दरवर्षी 26 नाेव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जात असताना भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचे स्मरण केले जाते. अांबेडकरांनी भारतीय संविधानाच्या रुपाने जगातील सर्वात माेठे संविधान तयार केले अाहे. जगातील सर्व संविधानांचा बारीक अभ्यास केल्यानंतर भारताचे संविधान तयार करण्यात अाले अाहे. या संविधानाला जगातील सर्वात माेठे संविधान म्हणून अाेळखले जाते. अापल्या संविधानात 448 अनुच्छेत, 12 उपसूचना अाणि 94 संशाेधनांचा समावेश अाहे. हे हस्तलिखित संविधान असून यात 48 अाॅर्टिकल अाहेत. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने अाणि 17 दिवसांचा कालावधी लागला. 

26 नाेव्हेंबर 1950 ला भारत एक लाेकशाही राष्ट्र म्हणून अाेळखले जाऊ लागले. डाॅ. बाबासाहेब अांबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हाेते. त्यांनी भारतातील विविधेचा विचार करुन सर्वसमावेशक असे संविधान तयार केले. 26 नाेव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान सभेकडून स्वीकारण्यात अाले. यानंतर 26 जानेवारी 1950 ला भारत या संविधानाप्रमाणे चालू लागला. 26 नाेव्हेंबरला संविधान हे संविधान सभेने स्वीकारल्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 29 अाॅगस्ट 1947 ला संविधानाच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात अाली हाेती. या समितीचे अध्यक्ष अांबेडकर हाेते. 

यात कुठल्याही प्रकारचे टायपिंग किंवा प्रिंटचा वापर करण्यात अाला नाही. संविधानाचा मसुदा तयार करणारी समिती हिंदी अाणि इंग्रजी या दाेन्ही भाषांमध्ये लिहिण्यात पारंगत हाेती. संविधानाच्या मसुद्यात कुठल्याही प्रकारच्या टायपिंगचा किंवा प्रिंटचा वापर करण्यात अाला नाही. संपूर्ण संविधान हे हाताने लिहीण्यात अाले. संविधान सभेच्या 284 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 ला संविधानाच्या मसुद्यावर सही केली हाेती. त्यानंतर दाेन दिवसांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 ला भारतात संविधान लागू करण्यात अाले. 

वी द पीपल ने संविधानाची सुरुवात वी द पीपल अाम्ही भारताचे लाेक या वाक्याने संविधानाच्या प्रस्ताविकेची सुरुवात हाेते. भारतीय लाेकशाही ही नागरिकांनी नागरिकांसाठी तयार केलेली लाेकशाही अाहे. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य तसेच अधिकार प्रदान केले अाहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही भारतीय संविधानाची मुल्ये अाहेत. 

लवचिक संविधान भारताचे संविधान निर्मात्यांकडे दूरदृष्टी हाेती. काळानुरुप संविधानामध्ये बदल करता येतील अशी व्यवस्था संविधान निर्मात्यांनी तयार केली. अात्तापर्यंत अनेकदा संविधानामध्ये काळानुरुप काही बदल करण्यात अाले अाहेत. परंतु स्वातंत्र्य, समता, बंधुता ही संविधाची प्रमुख मुल्ये बदलता येत नाहीत.  

संविधान दिनानिमित्त संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे अायाेजन संविधान दिनानिमित्त संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येते. सर्व सरकारी कार्यालये अाणि शाळांमध्ये संविधान दिन साजरा करण्यात अाला. युजीसी ने सुद्धा सर्व विद्यापीठांना संविधान दिन साजरा करण्याचे अादेश दिले हाेते. महाराष्ट्रातही विविध भागात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात अाला. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन यावेळी करण्यात अाले. 

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरdemocracyलोकशाही