शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ना हिंदू संकटात ना मुस्लिम; संकटात तर संविधान आहे : जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 21:17 IST

मुस्लिम म्हटला की अतिरेकी व दलित म्हटले की नक्षल असा प्रकार सुरू

ठळक मुद्देएनआरसी सीसीए कायदा विरोधी सभेला सारसबाग चौकात गर्दी

पुणे : नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुमचे धन्यवाद. कारण तुमच्यामुळे देशातील हिंदू मुस्लिम एकत्र येऊ लागले आहेत. ही लढाई फक्त हिंदु किंवा फक्त मुस्लिमांची अशी उरलेली नाही.  तूम्ही दगडी मारा, पण त्या दगडांचा आम्ही ताजमहाल करू आणि त्यातच तुमची कबर बांधू. सध्याच्या परिस्थितीत देशात ना हिंदू खतरेंमे ना मुस्लिम खतरेंमे है यहाँ खतरेंमे तो संविधान है अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 

पुण्यात 'संविधान बचाओ' आणि सीएए व एनआरसी विरोधी सभेचे आयोजन सारसबाग येथे करण्यात आले होते. त्यावेळी आव्हाड बोलत होते. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, आमदार जिग्नेश मेवाणी, आदी मान्यवर उपस्थित होते. आव्हाड पुढे म्हणाले, देशात हिंदू- मुस्लिम दरी करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.नथूराम म्हणजे पहिला अतिरेकी. महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. तो गांधी हत्येचा हा दिवस मूस्लिम तुष्टीकरणाच्या विरोधात त्यांची हत्या झालेली नाही तर बहुजन समाजाला सगळे दरवाजे खुले होत आहे त्या रागातून ती झाली, यावर माझा विश्वास आहे. तसेच आझादीच्या वेळेस नारा होता वंदे मातरम, आज सगळ्यांचा नारा जय भीम आहे. एनआरसी सीएए हा संविधानावरचा हल्ला आहे. बंच ऑफ थॉटस मधले आहे सगळे आत्ता सुरू आहे ते. संघात तेच शिकवतात. दुय्यम नागरिकत्व, तिरंगा पापी, चारवर्ण बरोबर हे सगळे त्या बंच ऑफ थॉटस '' मध्ये आहे.

जेएनयूला का घाबरतात हे? कारण तिथे गरीब विद्यार्थी आहेत. कन्हैय्याचे घर बघितले मी, मित्र आहे माझा, घरात फिरायला जागा नाही त्याच्या आणि तो आज दिल्लीत देशाचा आवाज झालाय.मोठेमोठे नेते जे करू शकत नाहीत ते देशाच्या विद्यापीठांमधील विद्यार्थी करत आहेत.झाडांवर चढून ते बोलतात आणि झाडासारखे मोठे लोक शांत आहेत. काही विचारायला आले तर संविधान दाखवा आणि हीच आमची ओळख हीच असे ठणकावून सांगा. मुस्लिम म्हटला की अतिरेकी व दलित म्हटले की नक्षल असा प्रकार सुरू आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले 

टॅग्स :PuneपुणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडHinduहिंदूMuslimमुस्लीमNarendra Modiनरेंद्र मोदीJignesh Mevaniजिग्नेश मेवानी