शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे हद्दपार करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर कटकारस्थान : शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:05 IST

- प्रस्तावित मार्गावरच हा प्रकल्प व्हावा, यासाठी जनआंदोलन उभारणार

राजगुरुनगर : पुणे-नाशिक ही देशभरातील पहिली हाय स्पीड रेल्व प्रास्तावित होती. या रेल्वे मार्गामुळे पुणे व नाशिक ही दोन्ही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कृषी व औद्योगिक मालाच्या वाहतुकीत मोठी चालना मिळेल. मात्र, या प्रकल्पाला जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी प्रकल्प अडथळा ठरत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. प्रस्तावित मार्ग बदलून अहमदनगर मार्गे रेल्वे प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.

खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात हा मार्ग होऊ नये, यासाठी वरिष्ठ स्तरावर कटकारस्थान शिजवले जात आहे. असा खळबळजनक आरोप करून ज्या मार्गावर रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आला. त्याच मार्गाने हायस्पीड रेल्वे प्रकल्प व्हावा, यासाठी जनआंदोलन उभारणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषेदत सांगितले.

पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प होताना तो उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात तसेच पुढे संगमनेर मार्गे सिन्नर, नाशिक असा प्रस्तावित करण्यात आला आहे. जीएमआरटी प्रकल्प बाधित होत असेल, तर नियोजित मार्गात कोणताही बदल न करता त्यावर योग्य तोडगा काढून रेल्व प्रकल्प पूर्णत्वाकडे न्यावा, या परिसरात काही अंतर दूरवरून रेल्वे मार्ग होऊ शकतो. असेही ते म्हणाले. पहिल्या सर्वेक्षणात पुणे नाशिक महामार्गाच्या पश्चिम बाजूने रेल्वेमार्ग प्रस्तावित होता.या सर्व प्रक्रियेत खोडद (ता. जुन्नर) येथील जीएमआरटीचा प्रश्न कुठेही उपस्थित झाला नव्हता. कारण, या मार्गापासून जीएमआरटी दुर आहे. नंतर पूर्व बाजूने मार्ग निश्चित करण्यात आला. संपादन झाले. शेतकऱ्यांना जवळपास चारशे कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. आत्ता जीएमआरटीवरुन हरकत घेतली जात असेल, ती एक पळवाट शोधली आहे, असे समजावे लागेल.हायस्पीड रेल्वे झाल्यास खेड, आंबेगाव आणि जुन्नर या पुणे जिल्ह्यातील तालुक्याच्या शेती विकासाला चालना मिळणार आहे. पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगांव, शिक्रापूर या औद्योगिक वसाहतीची नाशिक औद्योगिकीकरणाशी देवाणघेवाण होणार आहे. रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हायस्पीड किंवा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ प्रस्तावित मार्गावरच व्हावा, अशी येथील जनतेची आग्रही मागणी आहे. त्यासाठी मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा आढळराव पाटील यांनी दिला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा