शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पुणेकरांना सोमवारपासून दिलासा! शहरातील सर्व दुकाने ७ पर्यंत खुली; रेस्टॉरंट, बार, हॉटेल यांना रात्री १० पर्यंत परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 21:16 IST

रात्री १० नंतर अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त संचारबंदी लागू राहणार असून, ५ लोकांपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी

ठळक मुद्दे अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार रविवारी इतर सर्व दुकाने पूर्णंत: बंद राहणार

पुणे: महापालिका आायुक्त विक्रम कुमार यांनी जाहिर केलेल्या नव्या आदेशानुसार, उद्या (सोमवार) पासून शहरातील सर्व दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. तसेच मॉलही ५० टक्के क्षमतेने उघडणार असून, रेस्टॉरंट, बार, हॉटेल यांना रात्री १० पर्यंत खुली राहणार आहेत.  

तर उद्यापासून अत्यावश्यक सेवेबरोबरच सर्व प्रकारची दुकानेही आठवड्यातील सर्व दिवस खुली राहणार आहेत.  मात्र रात्री १० नंतर अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त संचारबंदी लागू राहणार असून, ५ लोकांपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. पुणे महापालिकेने आजपासून लॉकडाऊनमध्ये जाहिर केलेली शिथिलता केवळ महापालिका कार्यक्षेत्रापुरतीच मर्यादित नसून ही नवी नियमावली, पुणे कॅन्टोंमेंट बोर्ड व खडकी कॅन्टोमेंट बोर्ड यांना देखील लागू राहणार आहे. 

उद्यापासून सुरू होणारे व्यवहार व आस्थापना 

- सर्व दुकाने सायंकाळी ७ पर्यंत खुली- मॉल ५० टक्के क्षमतेने - आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने अभ्यासिका, ग्रंथालय, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था - सार्वजनिक वाचनालय - व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने - कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना- मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस - रेस्टॉरंट, बार, हॉटेल रात्री दहा पर्यंत़ (५० टक्के क्षमता)- लोकल ट्रेन मधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचारी - सर्व सार्वजनिक उद्याने, खुली मैदाने ( सकाळी ५ ते ९ पर्यंत व दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत)- सर्व आउटडोअर स्पोटर्स  - सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम (५० लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ पर्यंत परवानगी)- लग्न समारंभ कार्यक्रम हे हॉलच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत - अत्यंसंस्कार, दशक्रिया विधी व त्याच्याशी संबंधित कार्यक्रम २० लोकांच्या उपस्थितीत - विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा या ५० टक्के उपस्थितीत- महापालिका हद्दतील सर्व बांधकामे  - पीएमपीएमएल बस सेवा आसन क्षमतेच्या ५० टक्के  - माल वाहतूक करणाºया वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त ३ व्यक्तींना परवागनी - खाजगी वाहनातून, बसेस तसेच लांब अंतराच्या रेल्वेमधून आंतर जिल्हा करण्यास परवागनी़ - उद्योग व्यवसायास पूर्णत: खुली मात्र ५० टक्के उपस्थितीत

बंधने कायम  - सिनेमागृह, नाटयगृहे पूर्णत: बंद - अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार रविवारी इतर सर्व दुकाने पूर्णंत: बंद राहणार - शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलcollectorजिल्हाधिकारी