शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश पुणेकरांना दिलासा! सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल,डिझेल मिळणार; दुकाने खुली ठेवण्यासही परवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 16:25 IST

९७ टक्के पुणे शहर करण्यात आले खुले..

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह अन्य दुकाने उघडण्यासही परवानगी मोलकरणींसह घरगुती कामगारांना योग्य खबरदारी बाळगत कामावर येण्यास परवानगीकेंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सवलती टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार अत्यावश्यक सेवांसाठी नागरिकांना गरजेनुसार वाहन घेऊन फिरण्यास परवानगीखासगी ऑफिसेस खुली करण्यास अद्याप परवानगी नाही.

पुणे : गेल्या ४५ दिवसांपासून लॉड डाऊनमुळे घरातच बसून असलेल्या बहुतांश पुणेकरांना महापालिकेने दिलासा दिला असून पुर्ण शहराचा ८४ चौरस किलोमीटरचा  ''कंटेन्मेंट झोन'' कमी करुन तो १० चौरस किलोमीटरवर आणण्यात आला आहे. ९७ टक्के पुणे शहर खुले करण्यात आले असून या भागातील नागरिकांना दुचाकी व चारचाकींचा वापर करता येणार आहे. यासोबतच त्यांना पेट्रोल डिझेलही उपलब्ध होणार आहे. यासोबतच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह अन्य दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मोलकरणींसह घरगुती कामगारांना योग्य खबरदारी बाळगत कामावर येण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.गेल्या दोन महिन्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता झोपडपट्ट्या, दाटीवाटीच्या भागात सर्वाधिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. हा भाग कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सवलती टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. पुण्यामध्ये नागरिकांना आवश्यक गोष्टी टप्प्याटप्प्याने खुल्या केल्या जाणार आहेत. अत्यावश्यक सेवांसाठी नागरिकांना गरजेनुसार वाहन घेऊन फिरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच बांधकाम मजूर जर साईटवरच राहणार असतील तर अशा बांधकाम प्रकल्पांना काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ई-कॉमर्सअंतर्गत येणा-या आस्थापनांना सवलत देण्यात येणार आहे.खुल्या करण्यात आलेल्या भागातील वैयक्तिक दुकानांना प्राधान्य देण्यात आले असून जिवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. ज्या रस्त्यावर सलग दुकाने आहेत अशा ठिकाणी एकाआड एक अशी पाच दुकाने सुरु ठेवता येणार आहेत.=====खासगी ऑफिसेस खुली करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. कोणत्याही स्वरुपाच्या खासगी दुकानांना परवानगी नसली तरी आगामी काळात शासनाच्या निदेर्शांनुसार बदल होऊ शकतो.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस