शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
3
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
4
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
5
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
6
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
7
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
8
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
9
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
10
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
11
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
12
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
13
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
14
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
15
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
16
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
17
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
18
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
20
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनसंख्या तसेच गल्लीबोळ लक्षात घेता हेल्मेट ‘हायवे’लाच बरे : गिरीश बापट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 19:47 IST

‘‘पुण्याची एकूण वाहनसंख्या तसेच गल्लीबोळांचे स्वरूप लक्षात घेता हेल्मेट सक्ती फक्त हायवे वरच असावी असे वाटते,

ठळक मुद्देकायदा आहे, त्याचे पालन करायला हवेट्रिपल शीट, वेगमर्यादा न पाळणारे तसेच मद्यपान करून गाडी चालवणारे यांवर कारवाई हवी.’’अपघात कमी करण्याचे दुसरेही उपाय आहेत

पुणे : हेल्मेट ‘हायवे’ लाच बरे, असे मलाच नाही तर अनेकांना वाटते असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. पोलिस त्यांना वरिष्ठांकडून येणाऱ्या आदेशाप्रमाणे काम करतात. त्यांना अपघात कमी करायचे आहेत, मात्र त्यासाठी आणखीही उपाय आहेत. या संदर्भात आपण पोलिस आयुक्तांशी बोलू असे ते म्हणाले.

लोकसभेच्या १७ जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला खासदार म्हणून प्रथमच उपस्थित राहण्यासाठी जाण्यापुर्वी बापट यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. त्यात हेल्मेट सक्तीचा प्रश्न उपस्थित होताच बापट म्हणाले, ‘‘पुण्याची एकूण वाहनसंख्या तसेच गल्लीबोळांचे स्वरूप लक्षात घेता हेल्मेट सक्ती फक्त हायवे वरच असावी असे वाटते, मात्र कायदा आहे, त्याचे पालन करायला हवे. युवकांकडून फारच वाईट पद्धतीने वाहने चालवली जातात, त्यातून अपघात होतात. त्यामुळेच अपघात कमी करायचे असतील तर त्यासाठी अनेक उपाय आहेत. एकेरी वाहतूकीत शिरणारे, ट्रिपल शीट जाणारे, वेगमर्यादा न पाळणारे तसेच मद्यपान करून गाडी चालवणारे अशांवर कारवाई व्हायला हवी.’’

पुण्याचे काही मोठे प्रकल्प रखडले आहेत असे स्पष्ट करून बापट म्हणाले, त्यासाठीच खासदार झाल्यानंतर लगेचच जिल्हाधिकारी, आयुक्त यांची आढावा बैठक घेतली. त्यात याविषयी चर्चा केली आहे. २४ तास पाणी योजनेच्या कामात कुचराई करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. या योजनेच्या कामाचा दर आठवड्याला अहवाल देण्याबाबत आयुक्तांना सांगितले आहे. पालखी मार्गाच्या कामाबाबतही संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. कॅन्टोन्मेट तसेच केंद्र सरकारशी संबधित असे रेल्वे, विमानतळ याबाबतचे काही प्रश्न आहेत. स्मार्ट सिटी बाबतही काही कल्पना आहेत. या सर्व गोष्टींचा आता सातत्याने आढावा घेत राहून अधिकाऱ्यांना कार्यप्रवण केले जाईल. काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 

 

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटPoliceपोलिस