संमतीनेच बाह्यवळणाचा प्रश्न सोडवू
By Admin | Updated: June 12, 2017 01:09 IST2017-06-12T01:09:17+5:302017-06-12T01:09:17+5:30
खेड-सिन्नर बाह्यवळण रस्त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याची कार्यवाही तत्परतेने केली जाईल.

संमतीनेच बाह्यवळणाचा प्रश्न सोडवू
लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : खेड-सिन्नर बाह्यवळण रस्त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याची कार्यवाही तत्परतेने केली जाईल. कळंब येथील शेतकऱ्यांच्या संमतीनेच बाह्यवळणाचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही तहसीलदार रवींद्र सबनिस यांनी दिली.
कळंब येथील ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे-नाशिक महामार्गावरील रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक झाली. कळंब बाह्यवळणासंदर्भात शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास कहडणे यांच्याशी तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी साधकबाधक चर्चा केली.
दरम्यान, कळंब परिसरातील जवळपास २० शेतकऱ्यांच्या बागायती शेती, वर्पेमळा, गणेशवाडी येथील पुणे-नाशिक महामार्गात गेली आहे. त्यांना अजून त्याचा आर्थिक मोबदला मिळालेला नाही. या वेळी मंडल अधिकारी राजेंद्र ठुबे, महेंद्रनाथ कानडे, किरण भालेराव, गणपत भालेराव, भगवान शिंदे, अशोक सहाणे, अनिल सहाणे, रामदास भालेराव उपस्थित होते.