शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सहमतीने ठेवलेले संबंध अत्याचार नाही; न्यायालयाने केली आरोपीची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 15:35 IST

दोघेही घटस्फोटीत. लग्न जुळवणाऱ्या एका संकेतस्थळावरून एकमेकांच्या संपर्कात आले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर

पुणे : दोघेही घटस्फोटीत. लग्न जुळवणाऱ्या एका संकेतस्थळावरून एकमेकांच्या संपर्कात आले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधायचे ठरविले. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने महिलेला बोलावले. तेथे आरोपीने बलात्कार केला; तसेच चार दिवसांनंतर विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला. मात्र, दोन प्रौढ व्यक्तींनी सहमतीने शारीरिक संबंध ठेवले असल्यास बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा लागू होत नाही, असा निष्कर्ष नोंदवून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल बलात्काराच्या गुन्ह्यातून आरोपीला निर्दोष मुक्त केले.या गुन्ह्यात आरोपीला निर्दोष मुक्त करण्यासाठी आरोपीतर्फे ॲड. प्रसाद निकम, ॲड. मन्सूर तांबोळी, ॲड. शुभम बोबडे यांनी अर्ज केला. आरोपी (वय ३५) नामांकित कंपनीसाठी सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन डेव्हलपिंगचे काम करतो. त्याच्याविरोधात बांधकाम कंपनीत ‘एचआर’ पदावर कार्यरत महिलेने (वय ३७) बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या ‘कलम ३७६’, ‘३५४ ब’ आणि ‘३४२’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.आरोपी व तक्रारदार यांनी लग्न करायचे ठरवले होते. दोघांनी सहमतीने शरीरसंबंध ठेवले होते. मात्र, काही अडचणी उद्भवल्याने आरोपी तक्रारदार महिलेसोबत लग्न करू शकला नाही. लग्नाचे वचन मोडणे म्हणजे बलात्कार नव्हे, असे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी नमूद केले आहे. लग्नाचे आश्वासन खोटे नसेल आणि काही कारणास्तव प्रियकर आपल्या प्रेयसीशी लग्न करू शकला नाही, तर तो बलात्काराचा गुन्हा मानला जात नाही, असा युक्तिवाद करीत बचाव पक्षाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचे दाखले दिले. ते न्यायालयाने ग्राह्य धरले.दोन प्रौढ व्यक्तींनी एकमेकांच्या संपर्कात येऊन शारीरिक संबंध ठेवले आणि त्यांना लग्न करणे शक्य न झाल्याने तक्रार दाखल करण्यात आली, अशी वस्तुस्थिती तपासात समोर आली आहे. आरोपी आणि तक्रारदार यांच्यातील शारीरिक संबंध सहमतीने झाल्याचे रेकॉर्डवरून दिसते. त्यामुळे प्रथमदर्शनी कथित गुन्हा लागू होत नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटक