शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांचा ताफा अडवला, जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 14:29 IST

सोमय्या यांचा ताफा गजानन महाराज मंदिर चौकातून जात असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली....

पुणे : व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आहेत. सोमय्यांचा पुणे दौऱ्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला. भाजपचे पर्वतीचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे सध्या आजारी आहेत. प्रयाग हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेतल्यानंतर सोमय्या पर्वती भागातील भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरी जेवणासाठी गेले. यादरम्यान सोमय्या यांचा ताफा गजानन महाराज मंदिर चौकातून जात असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली.

याच दरम्यान रस्त्याच्याकडेला दबा धरून बसलेले काही कार्यकर्ते अचानकपणे समोर आले. त्यांनी काळे झेंडे दाखवत सोमय्या यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांनी धावपळ करत काही कार्यकर्त्यांना पकडलं. त्यानंतर सोमय्या कार्यकर्त्यांच्या घरी पोहचू शकले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमय्या ज्या ठिकाणी आले आहेत त्या इमारती समोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर पुण्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सोमय्या यांचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर सोमय्या पुण्यात येताच काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाले.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याPuneपुणेBJPभाजपा