शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने पुण्यासाठी वापरला ' हा ' अजब फंडा.. नंतरच ''मोहन जोशीं '' च्या हाती दिला झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 12:53 IST

प्रदेश शाखेकडून आलेल्या तीन नावांशिवाय अन्य नावे अचानक समोर आल्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीच्या सदस्यांनाही निर्णय घेणे अवघड झाले होते.

ठळक मुद्देसर्वाधिक पसंती: तीन दिवसात झाली पाहणीकेंद्रीय निवड समितीला निर्णय घेणे झाले अशक्य , हा विषय नेला पक्षातील वरिष्ठांकडे

पुणे : कोणाचेही एक नाव निश्चित होत नसल्यामुळे पक्षातील वरिष्ठांनी स्वत: एका एजन्सीच्या माध्यमातून थेट पुणे लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण केल्यानंतरच मोहन जोशी यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले असल्याचे समजते. खुद्द जोशी हेही नाव मागे पडल्याचे समजून स्पर्धेतून बाहेर पडले होते, मात्र या सर्वेक्षणाच्या अहवालाने त्यांना संजीवनी मिळाली.पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  या एजन्सीने पक्षातील कार्यकर्ते, शहरातील झोपडपट्टी तसेच व्यापारी व व्यावसायिक अशा तीन स्तरात ही पाहणी केली. या थरातील काही व्यक्तींना काँग्रेसचा उमेदवार म्हणून कोणाला पसंती द्याल व का अशी विचारणा करण्यात आली. पालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे, शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेस पक्षात लोकसभेच्या उमेदवारीसाठी म्हणून प्रवेश करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड व माजी आमदार असलेले मोहन जोशी अशी तीन नावे होती.प्रदेश शाखेकडून आलेल्या तीन नावांशिवाय अन्य नावे अचानक समोर आल्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीच्या सदस्यांनाही निर्णय घेणे अवघड झाले होते. त्यातच प्रविण गायकवाड यांच्या नावाला प्रदेश शाखेकडून संमती होती तर स्थानिक शाखेचा मात्र तीव्र विरोध होता. पक्षाबरोबर एकनिष्ठ असलेल्या कोणालाही उमेदवारी द्या, मात्र पक्षाबाहेरच्या कोणालाही नको, त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर अनिष्ट परिणाम होईल असे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे केंद्रीय निवड समितीला निर्णय घेणे अशक्य झाले व त्यांनी हा विषय पक्षातील वरिष्ठांकडे नेला. उमेदवार जाहीर करण्यासाठी विलंब होण्यामागे हेच कारण होते.पक्षातील या वरिष्ठ नेत्याने त्यानंतर थेट पक्षाध्यक्षांकडे चर्चा करून तीन दिवसात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे या एजन्सीच्या काही कर्मचाऱ्यांनी पुण्यात येऊन वरिल तीन स्तरांमधील काही निवडक समुदायांबरोबर चर्चा केली. त्यात सर्वाधिक पुढे जोशी यांचे नाव असल्याचे समजले. पक्षातील सुत्रांना याविषयी माहिती विचारली असता पक्षाबरोबर कायम एकनिष्ठ या मुद्द्यावर नागरिकांनी जोशी काँग्रेसचे उमेदवार असावेत असे म्हटले असल्याचे सांगण्यात आले. एजन्सीने हा अहवाल पक्षातील वरिष्ठांना सादर केल्यानंतरच पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार म्हणून मोहन जोशी यांचे नाव त्वरेने जाहीर करण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpune-pcपुणे