शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Ravindra Dhangekar Meet Sharad Pawar: रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट, मोहोळांवर टीका; म्हणाले, “आमच्याकडे वस्ताद आहे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 11:17 IST

Ravindra Dhangekar Meet Sharad Pawar: शरद पवार यांची भेट घेऊन सल्ला, मार्गदर्शन घेतले. शरद पवारांच्या पुण्यात सहा सभा होणार आहेत, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

Ravindra Dhangekar Meet Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर बैठका, दौरे, भेटी-गाठी यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मित्र पक्षातील नेत्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्यापही स्पष्ट झालेला पाहायला मिळत नाही. यातच काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. 

भाजपाने पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी घोषित करण्यात आली. तर मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांच्या पदरी निराशा पडली असली तर ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. वसंत मोरे अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक रिंगणात उतरू शकतात, असा कयास आहे. यातच रवींद्र धंगेकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना या भेटीबाबत माहिती दिली. तसेच भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार टीका केली.

शरद पवार यांची भेट घेऊन सल्ला, मार्गदर्शन घेतले

पुण्यात शरद पवार यांच्या सहा सभा होणार असल्याची माहिती देताना रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. बापट साहेबांना मुरलीधर मोहोळ यांनी किती त्रास दिला, त्यांना किती छळले, हे सगळ्यांना माहिती आहे, असे सांगत, होळी आहे, वाईट प्रवृत्ती यांचा नाश होवो. शरद पवार यांची भेट घेऊन सल्ला, मार्गदर्शन घेतले. शेती ते आयटीपर्यंत शरद पवार यांचे काम आहे. निवडणुकीचे नियोजन, पक्षाच्या सभा या सगळ्यासंदर्भात चर्चा केली, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

त्यांच्याकडे पैलवान असेल तर आमच्याकडे वस्ताद आहे मुरलीधर मोहोळ यांनी कुठल्या पैलवानला दूध पाजले? बिल्डर लोकांना दूध पाजले, हे क्षेत्र हे 'जय बजरंगबली'चे क्षेत्र आहे. पैलवान हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो. पैलवान हा सगळ्यांचाच असतो.  मुरलीधर मोहोळ यांनी गोखले, व्यास यांना दूध पाजले, त्यांनी आमच्या गरीब पैलवानांना अर्धा लीटर दूध पाजले नाही. जर त्यांच्याकडे पैलवान असतील तर आमच्याकडे वस्ताद आहेत, असा टोला रवींद्र धंगेकर यांनी लगावला. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसBJPभाजपा