शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर; राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 14:30 IST

आवश्यकता भासल्यास मुंबईला हलविणार....

पुणे: काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना १९ एप्रिलला कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली होती. २२ तारखेला त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांना २५ तारखेला जहांगिर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासन आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.

राज्यमंत्री व काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी गुरूवारी(दि.२९) दुपारी सातव यांच्या तब्येतीची जहांगिरमध्ये जाऊन विचारपूस केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांंनी माहिती घेतली. यानंतर कदम पत्रकार परिषदेत बोलत होते.

कदम म्हणाले, खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्यांना २५ तारखेला जहांगिरमध्ये दाखल करण्यात आले. तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागातआवश्यकतेनुसार सर्व उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा करण्यासाठी जहांगीरमधील डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. मला खात्री आहे ते लवकर बरे होतील. कुटुंबातील सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत.याप्रसंगी सर्वांच्या प्रार्थनाच कामाला येणार आहे असेही विश्वजीत कदम म्हणाले.

आवश्यकता असल्यास मुंबईला हलवणार...

सध्या तरी जहाँगिर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली राजीव सातव यांच्यावर उपचार सुरू आहे.मात्र,आवश्यकता असल्यास राजीव सातव यांना मुंबईला हलविण्यात येईल असेही कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदमhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या