शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या मार्गावरून पक्षांतर्गत ‘संघर्ष’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 20:51 IST

प्रदेश काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या जनसंघर्ष यात्रेचा पुण्यातील मार्ग ठरवण्यावरूनच प्रदेशच्या नेत्यांसमोरच दोन पदाधिकाऱ्यांनी या मतभेदांचे दर्शन घडवले. 

ठळक मुद्देकाँग्रेसची गटबाजी: नेत्यांच्या मध्यस्थीने थांबले भांडणपुण्यातच ७ किंवा ८ आॅगस्टला बीजे मेडिकल ग्राऊंडवर जनसंघर्ष यात्रेचा समारोप करण्यात येणार मतदारसंघातील यात्रेचा नक्की मार्ग कोठून जाणार याबाबत राजकीय औत्सुक्य

पुणे : महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २५ वरून थेट ९ पर्यंत आली तरीही काँग्रेसमधील मतभेद व पदाधिकाऱ्यांचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न काही संपायला तयार नाहीत. प्रदेश काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या जनसंघर्ष यात्रेचा पुण्यातील मार्ग ठरवण्यावरूनच प्रदेशच्या नेत्यांसमोरच दोन पदाधिकाऱ्यांनी या मतभेदांचे दर्शन घडवले. राज्य सरकारच्या विरोधात ३१ आॅगस्टला पश्चिम महाराष्ट्रातून काढण्यात येणाऱ्या जनसंघर्ष यात्रेचे नियोजन करण्यासाठी म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण असे दोन माजी मुख्यमंत्री शनिवारी पुण्यात आले होते. त्यांनी काँग्रेस भवनमध्ये सकाळी पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोल्हापूर, सांगली, सातारा असा प्रवास करीत ही यात्रा पुण्यात ६ आॅगस्टला रात्री येईल. पुण्यातच ७ किंवा ८ आॅगस्टला बीजे मेडिकल ग्राऊंडवर यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.यात्रेचा मुक्काम असल्यामुळे पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरून यात्रा न्यावी अशी सुचना चव्हाण यांनी केली. त्यावर पुण्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात यात्रा न्यावी असा निर्णय झाला. त्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले. पर्वती मतदारसंघातून यात्रा कशी न्यायची यावर दोन नेत्यांमध्ये मतभेद झाले. गंगाधाम चौकातून ती सुरू होईल शिवदर्शन येथील राजीव गांधी इ-लर्निंग स्कूलमार्गे दांडेकर पुलावर येईल असे ठरले. हा मार्ग लांबचा होईल असे म्हणत एका नेत्याने यात्रा लक्ष्मीनगरमधून दांडेकर पुलाकडे न्यावी असे सुचवले.या दोन मार्गांवरून मतभेद निर्माण झाले. नेत्यांसमोरच वादावादी सुरू झाली. राजीव गांधी इ-लर्निंग स्कूलचे वावडे का आहे असा सवाल एका नेत्याने केला व राहूल गांधी आले होते त्यावेळीही त्यांना तिथे येण्यापासून थांबवण्यात आले अशी आठवणही दिली. त्यावर दुसऱ्या नेत्याने यात्रा लांबून कशाला न्यायची असा सवाल केला. लक्ष्मीनगरमधून नेली तर चांगले होईल असा दावा केला. लक्ष्मीनगरचा रस्ता चिंचोळा आहे, त्यापेक्षा मोठ्या रस्त्याने नेल्यास अडचण होणार नाही असा युक्तीवाद त्यावर करण्यात आला. अखेरीस चव्हाण यांनीच नंतर पाहू म्हणत त्यात मध्यस्थी केली. आता या मतदारसंघातील यात्रेचा नक्की मार्ग कोठून जाणार याबाबत राजकीय औत्सुक्य निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण