शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

काँग्रेसची देशात आजची मतांची टक्केवारी इतर कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा जास्त - पृथ्वीराज चव्हाण

By राजू इनामदार | Updated: March 31, 2023 18:26 IST

देशात विरोधक एकत्र आल्यास भाजपचा पराभव होईल

पुणे: देशातील राजकीय स्थिती असाधारण आहे ही वस्तूस्थिती मान्य करायला हवी. राहूल गांधीविरोधात ज्याप्रकारे कारवाई झाली तो प्रकार राजकीय षडयंत्राचाच आहे. देशातील या विषयावर विरोधकांचे ऐक्य करणे काँग्रेसलाच शक्य आहे, मात्र ते लक्षात घेऊनच त्यांनी थोडा समजूदारपणा दाखवायची गरज आहे असे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

राहूल गांधी यांच्या समर्थनासाठी जाहीर केलेल्या संकल्प यात्रेची माहिती देण्यासाठी चव्हाण काँग्रेसभवनमध्ये आले होते. पत्रकार परिषद झाल्यानंतर लोकमत बरोबर विशेष संवाद साधताना त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. काँग्रेसची देशात आजची मतांची टक्केवारी इतर कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा जास्त आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये ऐक्य करण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घ्यायला हवा. मात्र त्यासाठी काँग्रेसने थोडा समजतूदारपणाही दाखवायला हवा असे चव्हाण म्हणाले.म्हणजे काय? असे विचारले असता चव्हाण म्हणाले, “असे ऐक्य सुरू झाले की लगेचच नेतृत्व कोणी करायचे असा मुद्दा पुढे येतो व त्यावरून सगळे फिसकटते. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाही तेच हवे आहे. विरोधक एकत्र झाले त्यांचा पराभव होतो. याचे अगदी नेमके उदाहरण पुणे जिल्ह्यातील कसबा व चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात नुकतेच दिसले. कसब्यात एकाचएक उमदेवार होता तर काँग्रेसचा विजय झाला, चिंचवडमध्ये तसे झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. तिथे विरोधकांमधील दोन्ही पराभूत उमेदवारांची मतांची बेरिज विजयी उमेदवाराच्या मतांच्या पुढे आहे.”

समजूतदारपणा म्हणजे काय यावर चव्हाण यांनी विरोधकांच्या ऐक्य प्रक्रियेत नेतृत्वाचा मुद्दाच उपस्थित करू नये असे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “काँग्रेसने याबाबतीत दोन पावले मागे यायला हवे, तसेच अन्य विरोधकांनाही या गोष्टीचा आग्रह धरू नये. आधी भाजपचा पराभव, ते ज्या पद्धतीने सरकार चालवत आहेत, त्याचा पराभव हे मुख्य उद्दीष्ट आहे. जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेसच्या विरोधात असे ऐक्य यशस्वी करून दाखवले. त्यावेळेसही विरोधकांमध्ये कोणा एकाचे नेतृत्व नव्हते. सामुहिकपणे सगळे नेते नेतृत्व करत होते. त्यामुळे आता त्याचीच पुनरावृत्ती आवश्यक आहे.”

काँग्रेसमध्येच जीवंतपणा दिसत नाही या थेट प्रश्नावर चव्हाण म्हणाले, ''असे बाहेरून पाहणाऱ्यांना वाटते. देशातील असाधारण राजकीय परिस्थितीची पहिली जाणीव काँग्रेसलाच झाली. त्याविरोधात पहिला आवाजही काँग्रेसनेच उठवला आहे. आजही देशात काँग्रेस हाच तळागाळातील राष्ट्रीय पक्ष आहे. मात्र याचाच अर्थ त्यांनीच सतत आघाडीवर असावे असा होत नाही. उलट त्यांनी समंजसपणा दाखवावा अशी इतरांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. ते ओळखून काँग्रेसने पावले टाकावीत. आम्ही तसेच सुचवत असतो. आता देश, राज्य, जिल्हा तसेच गावस्तरावर संकल्प यात्रांचे आयोजन जाहीर केले आहे. यातही विरोधकांना सहभागी करून घ्यायचा विचार सुरू आहे. यात्रानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक होणार आहे.''

टॅग्स :PuneपुणेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार