शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महिलाच आणतील काँग्रेसची सत्ता : ममता भुपेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 21:24 IST

जनतेचा विकास फक्त महिलाच उत्तम करू शकते. त्यामुळे यापुढे घरोघरी जाऊन महिला मतदारांशी संपर्क वाढवण्याचे काम सुरू करावे.

ठळक मुद्देमहिला काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील कामकाजाच्या आढाव्यासाठी बैठक

पुणे: काँग्रेसची देशातील गेलेली सत्ता महिला काँग्रेसच परत मिळवून देईल. त्यासाठी काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या सर्व महिलांनी नेता नाही तर कार्यकर्ता होऊन घराघरापर्यंत पोहचावे व भाजपा प्रणित केंद्र सरकार करत असलेली जनतेची फसवणूक उघड करून सांगावी असे आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस व पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी ममता भूपेश यांनी केले.महिला काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील कामकाजाच्या आढाव्यासाठी काँग्रेस भवन येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, नवनिर्वाचित आमदार विश्वजीत कदम, माजी प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, शहराध्यक्ष रमेश बागवे, महिला शहराध्यक्ष सोनाली मारणे, एनएसयुआयचे अध्यक्ष अमिर शेख, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी आदी यावेळी उपस्थित होते. भूपेश म्हणाल्या, सन २०१४ च्या निवडणूकीत वारेमाप आश्वासने देत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला भूरळ घातली, मात्र आता जनता जागी झाली आहे.जनतेचा विकास फक्त महिलाच उत्तम करू शकते. त्यामुळे यापुढे घरोघरी जाऊन महिला मतदारांशी संपर्क वाढवण्याचे काम सुरू करावे. प्रदेशाध्यक्ष टोकस म्हणाल्या, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वाधिक नुकसान महिलांचे झाले आहे. ते त्यांच्यासमोर आणले पाहिजे. त्यासाठी समाजात फिरले पाहिजे, संपर्क ठेवला पाहिजे. संधी मिळताच काँग्रेसचे ध्येयधोरणे नागरिकांसमोर आणली पाहिजेत. गेलेली सत्ता यातूनच परत मिळणार आहे. कदम तसेच शेख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भूपेश यांनी यावेळी सर्व जिल्ह्यांचा तसेच शहरांचा तेथील पदाधिकाºयांबरोबर बोलून आढावा घेतला. शहर महिला काँग्रेसच्या १०० सभा घेण्याच्या निर्धाराचे त्यांनी कौतूक केले. अनुराधा नागवडे, भारती कोंड, वंदना सातपुते, साधना उगले, जयश्री पाटील, सरोज डाकी, पुणे ग्रामीण अध्यक्ष सिमा सावंत, आदींनी संयोजन केले.  

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाcongressकाँग्रेसBJPभाजपा