शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सरकारची फक्त घोषणाबाजी : थावरचंद गेहलोत यांची टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 18:23 IST

2014 पर्यंत मागील सरकारने दिव्यांगांसाठी केवळ 52 कॅम्प घेतले अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत काँग्रेसवर टीका केली. 

ठळक मुद्देकेंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत काँग्रेसवर टीकामहाराष्ट्रात दिव्यांगांसाठी 3 टक्के आरक्षण असून, वाढवण्याचा विचार करावा :थावरचंद गेहलोत

पुणे :   काँग्रेस सरकारने केवळ घोषणाबाजी करत प्रत्यक्ष काम केले नाही. दिव्यांगांना मोफत उपकरण वाटपाची योजनेला 1992 ला सुरवात झाली आहे. तेव्हापासून 2014 पर्यंत मागील सरकारने दिव्यांगांसाठी केवळ 52 कॅम्प घेतले अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत काँग्रेसवर टीका केली. आजवर सत्तेत असलेल्यांनी गरीब हटाओ नारा दिला मात्र, प्रत्यक्ष काम केले नाही. यामुळे गरीब - श्रीमंतामधील दरी वाढतच गेली. अशा परिस्थितीत मोदी सरकारने गरीब, दिव्यांगांसाठी महत्वपुर्ण निर्णय घेऊन त्यांना प्रवाहात आणण्याचे काम केले असेही ते म्हणाले. सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने गणेश कला क्रीडा मंच याठिकाणी सामाजिक अधिकारीता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात  1 हजार 152 दिव्यांग व्यक्तींना 1 हजार 758 उपकरणांचे वाटप करण्यात आले.    

     केंद्राने सरकारी नोकरीत 4 टक्के आरक्षण दिले आहे. तर प्रशासनात दिव्यांगांचा सहभाग वाढून ते स्वावलंबी होण्यासाठी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याने महत्वपुर्ण निर्णय घेत हे आरक्षण 6 टक्के केले आहे. महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी 3 टक्के आरक्षण असून त्यांनी देखील वाढवण्याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. एखाद्या कार्यालयात कामानिमित्त गेल्यावर आत जाण्यासाठी स्वतंत्र सुगम मार्ग, जिना, स्वच्छतागृह, रॅम्प, व्हिलचेअर आदींची सोय असावी यासाठी सुगम्य भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्रात 180 इमारतींची निवड करण्यात आली आहे तर 142 इमारतीठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाGovernmentसरकारministerमंत्रीcongressकाँग्रेस