सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचा मोर्चा
By Admin | Updated: March 24, 2015 00:26 IST2015-03-24T00:26:18+5:302015-03-24T00:26:18+5:30
पुणे कँटोन्मेंटमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्रातील भाजपा शासनाच्या निषेधार्थ सोमवारी समता भूमीपासून (महात्मा फुलेवाडा) जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.

सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचा मोर्चा
पुणे : दलित, मुस्लिम व ख्रिश्चनांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ पुणे कँटोन्मेंटमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्रातील भाजपा शासनाच्या निषेधार्थ सोमवारी समता भूमीपासून (महात्मा फुलेवाडा) जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.
बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मगुरूंसह स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभय छाजेड, माजी
आमदार मोहन जोशी, रमेश बागवे तसेच रशिद शेख, नुरुद्दिन सोमजी, मुख्तार शेख, अविनाश बागवे, लता राजगुरू, रजनी त्रिभुवन, लक्ष्मी घोडके, पुणे कँटोन्मेंटचे माजी सदस्य
मंजूर शेख, करण मकवाना, विठ्ठल थोरात आदींचा सहभाग होता.
महात्मा फुले पेठेतील समता भूमीपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा गेला. मुस्लिमांचे आरक्षण रद्द करणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार असो आदी घोषणा दिल्या जात होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. घरवापसीच्या नावाने मुस्लिम व ख्रिश्चनांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.