दिल्लीतील शेतकर्यांना पाठिंब्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST2020-12-05T04:16:30+5:302020-12-05T04:16:30+5:30

पुणे: शेती विषयक कायद्यातील दुरूस्त्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी सकाळी शहरातील ...

Congress agitation to support farmers in Delhi | दिल्लीतील शेतकर्यांना पाठिंब्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

दिल्लीतील शेतकर्यांना पाठिंब्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

पुणे: शेती विषयक कायद्यातील दुरूस्त्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी सकाळी शहरातील वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघांमध्ये आंदोलन करण्यात आले.

पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, केंद्र सरकारने आणलेल्या कायद्याच्या विरोधात देशातील सर्व शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. दिल्लीत एकत्र होऊन मागील आठ दिवस करत असलेल्या त्यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. शेतकरी एकटे नाहीत हे दाखवण्यासाठी म्हणून काँग्रेस हे आंदोलन करत आहे.

पर्वती विधानसभा मतदार संघात ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे व सतीश पवार, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात अजिज सैय्यद व राजेंद्र भुतडा, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात प्रदिप परदेशी व सुनील घाडगे, कसबा विधानसभा मतदार संघात प्रवीण करपे, वडगांवशेरी मतदार संघामध्ये विकास टिंगरे व रमेश सकट यांनी आंदोलन केले. प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, दत्ता बहिरट, सुनील शिंदे, संगिता तिवारी, सोनाली मारणे, विशाल मलके, अमित बागुल, द. स. पोळेकर, रमाकांत शिंदे, बुवा नलावडे, जयसिंग भोसले, मंजूर शेख तसेच पक्षाचे विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Congress agitation to support farmers in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.