इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:35+5:302021-07-20T04:09:35+5:30
सासवड : वाढत्या पेट्रोल-डिझेल, सिलिंडर दरवाढीच्या विरोधात सासवडमध्ये काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. या वेळी प्रतीकात्मक दुचाकीची अंत्ययात्रा ...

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
सासवड : वाढत्या पेट्रोल-डिझेल, सिलिंडर दरवाढीच्या विरोधात सासवडमध्ये काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. या वेळी प्रतीकात्मक दुचाकीची अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच महिला काँग्रेसच्यावतीने रस्त्यावर चुली मांडून पिठलं-भाकरी बनवून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
याप्रसंगी आमदार संजय जगताप, प्रदेश युवकचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पुरंदर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पोमण, महिला अध्यक्ष सुनीता कोलते, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, युवकचे माऊली यादव, गणेश जगताप ,मयूर मुळीक, सचिन दुर्गाडे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. इंधन, गॅस दरवाढ, बेरोजगारीचे वाढते प्रमाण त्यातच शेतकऱ्यांना युरिया खत मिळेनासे झाले आहे. केंद्र सरकारचा कोणत्याही गोष्टींवर नियंत्रण राहिले नसून महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत केंद्र सरकारवर आमदार संजय जगताप यांनी निशाणा साधला.
१९ सासवड आंदोलन