शाळांच्या मालकीबाबत गोंधळ?

By Admin | Updated: November 17, 2016 02:01 IST2016-11-17T02:01:09+5:302016-11-17T02:01:09+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या मालकीबाबत सावळा गोंधळ आहे.

Confusion of school ownership? | शाळांच्या मालकीबाबत गोंधळ?

शाळांच्या मालकीबाबत गोंधळ?

उरुळी कांचन : जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या मालकीबाबत सावळा गोंधळ आहे.
उरुळी कांचन परिसरात जिल्हा परिषदेने खर्च करून बांधलेल्या शाळांच्या जागा या जिल्हा परिषदेच्या वा पंचायत समितीच्या किंवा ग्रामपंचायतीच्या नावावर नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारात मागितलेल्या कागदपत्रांवरून उघड झाली आहे. नियमानुसार जिल्हा परिषदेच्या नावावर असणे क्रमप्राप्त असताना प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या गलथान कारभाराने या भागातील तत्कालीन दानशूर व शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या बुजुर्गांनी दिलेल्या सध्यस्थितीतील लाखो रुपये किमतीच्या जागा केवळ स्थानिकांच्या दादागीरीनेच आहे त्या अवस्थेत जागा कशीबशी ताब्यात ठेवण्याची कसरत ज्या त्या ठिकाणच्या शिक्षकांना करावी लागत आहे.
उरुळी कांचन परिसरात गावठाण (उर्दू शिक्षण शाळा), तुपे वस्ती, खेडेकर मळा, टिळेकर मळा, पांढरस्थळ, दत्तवाडी, आश्रम रोड या जिल्हा परिषदेच्या वतीने चालविलेल्या प्राथमिक शिक्षणासाठीच्या शाळा आहेत. या शाळांच्या जागांच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ८ च्या दप्तरी जिल्हा परिषद शाळा व पुढे ठिकाणचा उल्लेख आहे. पण, या जागांच्या ७/१२ च्या उताऱ्यावर फक्त पीक पाण्याच्या नोंदी सदरात शाळा पट अशा नोंदी आहेत. यापैकी पांढरस्थळातील शाळा तर ज्या गटातील जागा शाळेसाठी भूमिदान म्हणून बक्षीस पत्राने दिल्या आहेत. त्या गटातील जागांवर शाळा न बांधता दुसऱ्याच गटातील जागांवर शाळा बांधून त्याची बक्षीसपत्रेदेखील चुकीचे गट नंबर टाकून केल्याचे ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या कागदपत्रावरून दिसत आहे. वरीलपैकी फक्त आश्रम रोडवरील शाळेच्या जागेची नोंद भूमिदानाने मिळालेल्या जागेच्या गटावर आहे. पण, क्षेत्राचा ताळमेळ बसत नाही, अशीही गोची आहे, तोच प्रकार इतर ठिकाणच्या शाळांच्या जागांबाबत आहे. पण अधिकारीवर्ग त्याकडे लक्ष देताना दिसत नाही, हे वास्तव आहे.
पांढरस्थळातील शाळा गेले कित्येक दिवस कम्पाउंडवॉलच्या प्रतीक्षेत आहे. पण शिंदवणे हद्दीतील एक धनदांडगी व्यक्ती शीव हद्द ओलांडून म्हणजे शिंदवणे व उरुळी कांचन या दोन गावांच्या शीवेवर असलेला रस्ता सोडून उरुळी कांचनच्या हद्दीत आमचीच जागा आहे, असे सांगत या कामात अडथळा आणत आहे. (वार्ताहर)

Web Title: Confusion of school ownership?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.