शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वासाने ध्येयाला सामोरे जा

By admin | Updated: January 24, 2017 02:20 IST

विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आत्मविश्वासाने, स्वत:शी बांधिलकी ठेवून आणि एकाग्रतेने काम केले पाहिजे.

पुणे : विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आत्मविश्वासाने, स्वत:शी बांधिलकी ठेवून आणि एकाग्रतेने काम केले पाहिजे. स्वत:वर विश्वास ठेवून सातत्याने कष्ट केले तर तुम्ही काहीही करू शकता, असा सल्ला टाटा इंडस्ट्रीजचे माजी व्यवस्थापकीय संचालक किशोर चौकर यांनी सी.ए.च्या विद्यार्थ्यांना दिला.पुणे विभागीय इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडिया (आयसीएआय) बोर्ड आॅफ स्टडीज्च्या वतीने सीएच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित राष्ट्रीय परिषदेत चौकर बोलत होते. कार्यक्रमाला उद्योगपती हणमंत गायकवाड, आयसीएआयच्या बोर्ड आॅफ स्टडीज्चे अध्यक्ष बाबू इब्राहिम कालिवयालील, आयसीआय पुणे विभागाच्या अध्यक्षा रेखा धामणकर, सेंट्रल कौन्सिल मेंबर एस. बी. झावरे, वेस्टन इडिया चार्डर्ड अकाउंटंट स्टुडंट असोसिएशनचे (विकासा) अध्यक्ष चारुहास उपासनी, डब्ल्यूआयआरसीच्या अध्यक्षा श्रुती शहा, पुणे विभागाच्या आयसीएआयचे सचिव अभिषेक धामणे, सर्वेश जोशी, सत्यनारायण मुंदडा, राजेश अगरवाल, अरुण गिरी, आनंद जकोटिया, ऋता चितळे आदी उपस्थित होते.सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संवाद वाढावा, तसेच त्यांना संशोधनाची गोडी लागावी आणि विविध विषयांची मांडणी करता यावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला ३,५०० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. विद्यार्थ्यांनी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वैयक्तिक व शैक्षणिक विकासावर भर द्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी परिषदेतून विद्यार्थ्यांना दिला. (प्रतिनिधी)