आत्मविश्वासाने ध्येयाला सामोरे जा
By Admin | Updated: January 24, 2017 02:20 IST2017-01-24T02:20:52+5:302017-01-24T02:20:52+5:30
विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आत्मविश्वासाने, स्वत:शी बांधिलकी ठेवून आणि एकाग्रतेने काम केले पाहिजे.

आत्मविश्वासाने ध्येयाला सामोरे जा
पुणे : विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आत्मविश्वासाने, स्वत:शी बांधिलकी ठेवून आणि एकाग्रतेने काम केले पाहिजे. स्वत:वर विश्वास ठेवून सातत्याने कष्ट केले तर तुम्ही काहीही करू शकता, असा सल्ला टाटा इंडस्ट्रीजचे माजी व्यवस्थापकीय संचालक किशोर चौकर यांनी सी.ए.च्या विद्यार्थ्यांना दिला.
पुणे विभागीय इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडिया (आयसीएआय) बोर्ड आॅफ स्टडीज्च्या वतीने सीएच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित राष्ट्रीय परिषदेत चौकर बोलत होते. कार्यक्रमाला उद्योगपती हणमंत गायकवाड, आयसीएआयच्या बोर्ड आॅफ स्टडीज्चे अध्यक्ष बाबू इब्राहिम कालिवयालील, आयसीआय पुणे विभागाच्या अध्यक्षा रेखा धामणकर, सेंट्रल कौन्सिल मेंबर एस. बी. झावरे, वेस्टन इडिया चार्डर्ड अकाउंटंट स्टुडंट असोसिएशनचे (विकासा) अध्यक्ष चारुहास उपासनी, डब्ल्यूआयआरसीच्या अध्यक्षा श्रुती शहा, पुणे विभागाच्या आयसीएआयचे सचिव अभिषेक धामणे, सर्वेश जोशी, सत्यनारायण मुंदडा, राजेश अगरवाल, अरुण गिरी, आनंद जकोटिया, ऋता चितळे आदी उपस्थित होते.
सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संवाद वाढावा, तसेच त्यांना संशोधनाची गोडी लागावी आणि विविध विषयांची मांडणी करता यावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला ३,५०० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. विद्यार्थ्यांनी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वैयक्तिक व शैक्षणिक विकासावर भर द्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी परिषदेतून विद्यार्थ्यांना दिला. (प्रतिनिधी)