शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोस पिंपरी सांडसमध्ये विरोध

By admin | Updated: March 18, 2015 22:58 IST

पिंपरी सांडस येथील वनविभागाच्या जागेत पुणे शहराचा नियोजीत कचरा डेपो बाबत शासन घेत असलेल्या निर्णयाला सर्वपक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येउन ठामपणे विरोध दर्शविला आहे.

पिंपरी सांडस : पिंपरी सांडस येथील वनविभागाच्या जागेत पुणे शहराचा नियोजीत कचरा डेपो बाबत शासन घेत असलेल्या निर्णयाला सर्वपक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येउन ठामपणे विरोध दर्शविला आहे. पुणे शहराच्या कचऱ्याची विल्लेवाट लावण्याकरिता पुणे महानगरपालिकेच्या नियोजित कचरा डेपो हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस येथील गायरान तथा सामाजिक वनी करणाच्या १९.५० हेक्टर क्षेत्रावर महानगरपालिक कचरा डेपो करण्याचा प्रयत्न करीत असले तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा या निर्णयाला विरोधच आहे. यासाठी कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीची सुद्धा स्थापना केली आहे या समितीचे अध्यक्ष विकास लवांडे आहेत. आयुक्ताना दिलेल्या या या निवेदनात असे म्हटले आहे की पिंपरी सांडस व परिसरातील १० गावाचे नागरिक , सामाजिक संस्था, ग्रामपंचायत संघटना सर्वराजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते संयुक्तपणे स्थापन केलेल्या कचरा डेपो विरोधी समितीच्या वतीने या परिसरातील जीवसृष्टी,नैसर्गिक साधन संपत्तीवर या कचऱ्याचा विपरीत परिणाम होणार असुन प्रामुख्याने पाणी, शेतजमीन, हवा शेतक ऱ्यांच्या जीवनावर आधारित शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे . परिसरात रोगराई पसरुन सर्वाच्याच आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. पुर्वी फुरसुंगी व उरुळी देवाची याठिकाणी जो सामान्य नागरिकांस त्रास झाला तो या ठिकाणी होऊ शकतो शिवाय वाडेबोल्हाई येथील बोल्हाई माता मंदीप याठिकाणी येणारे भाविक यांना सुध्दा मोठ्या प्रमाणावर या दुगंर्धीचा त्रास होऊ शकतो असे निवेदनात म्हटले आहे.घनकचऱ्याची निर्मिती ही पुणे शहरानेच केली असल्याने त्याची योग्यरितीने विल्हेवाट सुध्दा पुणे महानगरपालिकेनेच करावी इतर कोणालाही त्रास न देता तसेच पर्यावरण व आरोग्याचे रक्षण करुन शहरात वार्डनिहाय कचऱ्याची समस्या कायमस्वरुपी सोडवावी आणि ते शक्य आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला शहरातील कचाऱ्याचा त्रास भोगण्यास लागु नये.तरी नियोजीत कचरा डेपो बाबत एकतर्फि घेतलेला निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा या पुढील दिशा आम्ही संघर्ष समितीच्या वतीने सत्याग्रही पद्धतीने व आंदोलनात्मक मागार्ने तीव्र विरोध करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष विकास लवांडे यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)च् या परिसरातील जीवसृष्टी,नैसर्गिक साधन संपत्तीवर या कचऱ्याचा विपरीत परिणाम होणार असुन प्रामुख्याने पाणी, शेतजमीन, हवा शेतक ऱ्यांच्या जीवनावर आधारित शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे . परिसरात रोगराई पसरुन सर्वाच्याच आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.च् कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीच्या वतीने माननीय विभागीय आयुक्त पुणे, महापौर पुणे महानगर पालिका तसेच महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदने दिले आहे