कचरा डेपोस पिंपरी सांडसमध्ये विरोध
By Admin | Updated: March 18, 2015 22:58 IST2015-03-18T22:58:07+5:302015-03-18T22:58:07+5:30
पिंपरी सांडस येथील वनविभागाच्या जागेत पुणे शहराचा नियोजीत कचरा डेपो बाबत शासन घेत असलेल्या निर्णयाला सर्वपक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येउन ठामपणे विरोध दर्शविला आहे.

कचरा डेपोस पिंपरी सांडसमध्ये विरोध
पिंपरी सांडस : पिंपरी सांडस येथील वनविभागाच्या जागेत पुणे शहराचा नियोजीत कचरा डेपो बाबत शासन घेत असलेल्या निर्णयाला सर्वपक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येउन ठामपणे विरोध दर्शविला आहे.
पुणे शहराच्या कचऱ्याची विल्लेवाट लावण्याकरिता पुणे महानगरपालिकेच्या नियोजित कचरा डेपो हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस येथील गायरान तथा सामाजिक वनी करणाच्या १९.५० हेक्टर क्षेत्रावर महानगरपालिक कचरा डेपो करण्याचा प्रयत्न करीत असले तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा या निर्णयाला विरोधच आहे. यासाठी कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीची सुद्धा स्थापना केली आहे या समितीचे अध्यक्ष विकास लवांडे आहेत. आयुक्ताना दिलेल्या या या निवेदनात असे म्हटले आहे की पिंपरी सांडस व परिसरातील १० गावाचे नागरिक , सामाजिक संस्था, ग्रामपंचायत संघटना सर्वराजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते संयुक्तपणे स्थापन केलेल्या कचरा डेपो विरोधी समितीच्या वतीने या परिसरातील जीवसृष्टी,नैसर्गिक साधन संपत्तीवर या कचऱ्याचा विपरीत परिणाम होणार असुन प्रामुख्याने पाणी, शेतजमीन, हवा शेतक ऱ्यांच्या जीवनावर आधारित शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे . परिसरात रोगराई पसरुन सर्वाच्याच आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. पुर्वी फुरसुंगी व उरुळी देवाची याठिकाणी जो सामान्य नागरिकांस त्रास झाला तो या ठिकाणी होऊ शकतो शिवाय वाडेबोल्हाई येथील बोल्हाई माता मंदीप याठिकाणी येणारे भाविक यांना सुध्दा मोठ्या प्रमाणावर या दुगंर्धीचा त्रास होऊ शकतो असे निवेदनात म्हटले आहे.घनकचऱ्याची निर्मिती ही पुणे शहरानेच केली असल्याने त्याची योग्यरितीने विल्हेवाट सुध्दा पुणे महानगरपालिकेनेच करावी इतर कोणालाही त्रास न देता तसेच पर्यावरण व आरोग्याचे रक्षण करुन शहरात वार्डनिहाय कचऱ्याची समस्या कायमस्वरुपी सोडवावी आणि ते शक्य आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला शहरातील कचाऱ्याचा त्रास भोगण्यास लागु नये.
तरी नियोजीत कचरा डेपो बाबत एकतर्फि घेतलेला निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा या पुढील दिशा आम्ही संघर्ष समितीच्या वतीने सत्याग्रही पद्धतीने व आंदोलनात्मक मागार्ने तीव्र विरोध करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष विकास लवांडे यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)
च् या परिसरातील जीवसृष्टी,नैसर्गिक साधन संपत्तीवर या कचऱ्याचा विपरीत परिणाम होणार असुन प्रामुख्याने पाणी, शेतजमीन, हवा शेतक ऱ्यांच्या जीवनावर आधारित शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे . परिसरात रोगराई पसरुन सर्वाच्याच आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
च् कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीच्या वतीने माननीय विभागीय आयुक्त पुणे, महापौर पुणे महानगर पालिका तसेच महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदने दिले आहे