शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पुणे महापालिकेच्या ताब्यातील मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी संगणक प्रणाली 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 1:30 PM

महापालिकेच्या मालकीच्या व भूसंपादन करून घेतलेल्या मालमत्तांची नोंद केली जाते. या मालमत्तांचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेचा स्वतंत्र कक्ष आहे

ठळक मुद्देअवघ्या तीन कर्मचाऱ्यांच्या मानधनावर वर्षभरात ही रक्कम खर्च होणारएक कोटी ५ लाख ८४ हजार रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी दिली मंजुरी

पुणे : महापालिकेच्या ताब्यातील मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी संगणकप्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित केली जाणार आहे. त्यासाठी आलेल्या एक कोटी ५ लाख ८४ हजार रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. अवघ्या तीन कर्मचाऱ्यांच्या मानधनावर वर्षभरात ही रक्कम खर्च होणार आहे. महापालिकेच्या मालकीच्या व भूसंपादन करून घेतलेल्या मालमत्तांची नोंद केली जाते. या मालमत्तांचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेचा स्वतंत्र कक्ष आहे. परंतु, त्याची संगणकीय प्रणाली अद्याप तयार केलेली नव्हती. कोट्यवधी रुपयांच्या जमिनींची देखभाल व व्यवस्थापन हे पालिकेपुढील मोठे आव्हान असते. अनेकदा पालिकेकडेच मालमत्तांची परिपूर्ण माहिती उपलब्ध नसते. पालिकेने बºयाचशा मिळकती भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत, तर अनेक मिळकती भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत. या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी संगणकप्रणाली विकसित करण्यासाठी शासनाने प्राधिकृत केलेल्या संस्थांना कळविण्यात आले होते. ......तीन कर्मचारी नेमणारया कंपनीच्या सादरीक रणामध्ये मालमत्ता व्यवस्थापनाकरिता संगणकप्रणाली विकसित करण्यासाठी एकूण तीन कर्मचारी नेमणार आहेत. त्यामध्ये मुख्य सल्लागाराचे एक पद व व्यवस्थापकीय सल्लागाराची दोन पदे समाविष्ट आहेत. एक वर्षासाठी मुख्य सल्लागाराला दरमहा ३ लाख २४ हजार रुपये, तर व्यवस्थापकीय सल्लागाराला दरमहा २ लाख ७९ हजार रुपये प्रतिव्यक्ती दर निश्चित केला आहे. त्यानुसार या कामासाठी १ कोटी ५ लाख ८४ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. ही प्रणाली विकसित करण्यास तसेच आवश्यकता भासल्यास तीन कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येईल. ..........या कंपन्यांकडून सादरीकरण करून घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठित केली होती. या समितीमध्ये साख्यिकी विभागाचे प्रमुख, मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त यांचा समावेश करण्यात आला होता. .......शासनाने प्राधिकृत केलेल्या विप्रो, केपीएमजी, ग्रॅन्ट थोर्नोट, डिलॉईट, एर्न्स्ट अ‍ॅन्ड यंग आणि पीडब्ल्यूसी या सहा कं पन्यांना या विषयावर सादरीकरण करण्यास ई-मेलद्वारे कळविण्यात आले होते. या सहा संस्थांपैकी केपीएमजी, एर्न्स्ट अ‍ॅन्ड यंग, पीडब्ल्यूसी या कंपन्यांनी सादरीकरण केले. समिती सदस्यांनी एर्न्स्ट अ‍ॅन्ड यंग या कंपनीच्या सादरीकरणाला सर्वाधिक गुण दिले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका