शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणात संगणकीय प्रणाली व ‘को-विन अ‍ॅप’च ठरताहेत 'स्पीड ब्रेकर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 11:15 IST

वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने संबंधित लाभार्थ्यांना वेळेत लसीकरणाचा एसएमएस न जाण्याचे प्रकार..

नीलेश राऊत- पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम १६ जानेवारीपासून सुरू झाले असले तरी, लसीकरणाकरिता तयार करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीमुळे व ‘को-विन अ‍ॅप’ मधील तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणास उशिर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना ही लस दिली जाणार आहे. त्यानुसार पुणे महापालिका हद्दीत शासकीय व खाजगी संस्थांमधील सुमारे ५६ हजार सेवकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नावनोंदणी केली आहे. या सर्वांची नावे संगणकीय प्रणालीे व ‘को-विन अ‍ॅप’ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीमुळे दिवसाला एका केंद्रावर शंभर अशा प्रमाणेच नोंदणी केलेल्या सेवकांची नावे येत आहेत. त्यातच या प्रणालीमुळे वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने संबंधित लाभार्थ्यांना वेळेत लसीकरणाचा एसएमएस न जाण्याचे प्रकारही घडत आहेत. या सर्व घटकांचा परिणाम शहरातील पहिल्या टप्प्यातील लसीकरणावर होत आहे.--------------१६ जानेवारी रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरूवात झाली. परंतु, पहिल्या दिवशी पुणे शहरात सर्वाधिक कमी लसीकरण झाल्याची नोंद घेतली गेली. लसीकरणासाठी केंद्रांची उभारणी केली गेली तरी, त्या केंद्रावर ज्या आरोग्य सेवकांना लस देण्यात येणार आहे, त्या सेवकांपर्यंत या संगणक प्रणालीतून एसएमएस वेळेत गेले नसल्याचे पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे. त्यातच ज्यांची नावे त्या दिवसाच्या शंभर जणांच्या यादीत आहेत, त्यापैकी काही आरोग्य सेवक आदल्या दिवशी रात्रपाळीला कामावर असतात, अथवा एक दिवसापूर्वीच पूर्वकल्पना नसल्याने काही जण बाहेर गावीही गेलेले असतात. तसेच ज्यांची नावे आहेत, त्यांना कोरोनाची लागण होऊन कोरोनामुक्त झाल्याच्या दिवसात अद्याप दोन महिने पूर्ण झाली नाहीत. अशा विविध समस्या सध्या समोर येत आहे.---------------------------मॅन्युअली प्रक्रिया सोयीस्कर    पुणे शहरात सुमारे ५६ हजार आरोग्य सेवकांनी लसीकरणासाठी नाव नोंदणी केली आहे. या सर्वांना संगणकीय प्रणालीमुळे व ‘को-विन अ‍ॅप’ व्दारे लसीकरणासाठीची वेळ दिली जाते. मात्र , हीच वेळ त्या आरोग्य सेवकाच्या कामाच्या सोयीनुसार, कोरोनामुक्त होऊन विधित कालावधी पूर्ण झाल्याचे पाहून दिली गेल्यास दिवसाला प्रत्येक केंद्रावर शंभर जणांना लस दिली जाऊ शकते. यामुळे शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्प्यात वेळेत आरोग्य सेवकांना लसीकरण होऊ शकते. याकरिता या प्रणालीबरोबरच मॅन्युअली प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष आरोग्य सेवकाशी बोलून त्याची वेळ घेणे व लसीकरणासाठी बोलविल्यास लसीकरण लवकरात लवकर होऊ शकते असे लसीकरणाची प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणचे म्हणणे आहे. --------------------------लसीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्रात वाढ होणार     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभी शासन आदेशानुसार शहरात १६ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती़ पण आजमितीला ही संख्या २५ वर नेण्यात आली असून, येत्या काही दिवसात त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. गुरूवार दि. ४ फेब्रुवारी शहरात १ हजार ७८६ जणांना लस देण्यात आली असून, ही टक्केवारी ८९़३ टक्के इतकी आहे.-----------------------------

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका