शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी संयुक्त मोजणी : भूमी अभिलेखची मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 20:25 IST

राजस सोसायटी ते खडी मशीन चौकादरम्यानच्या साडेतीन किलोमीटर रस्त्यासाठी ही मोजणी केली जाणार आहे...

ठळक मुद्देसाडेतीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी भरले अडीच लाख रुपयेयेत्या गुरुवारपासून प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात होणार

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला हळूहळू वेग येऊ लागला असून पालिकेने या रस्त्यासाठी बाधित होणाऱ्या जागांच्या संयुक्त मोजणी प्रक्रियेला सोमवारी सुरुवात केली. राजस सोसायटी ते खडी मशीन चौकादरम्यानच्या साडेतीन किलोमीटर रस्त्यासाठी ही मोजणी केली जाणार असून त्यासाठी पालिकेने भूमी अभिलेख कार्यालयाकडे अडीच लाख रुपये भरले आहेत. येत्या गुरुवारपासून प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात होणार आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर वाहतूकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कात्रज, कोंढवा, फुरसुंगी, येवलेवाडी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी आदी भागातील नागरिकीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. याभागातील बांधकामाचा वेगही झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण येत असून प्राणांतिक अपघातांचे प्रमाणही लक्षणिय आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करुन पदर वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव असून त्याच्या प्रक्रियेला सुरुवातही करण्यात आली आहे. या रुंदीकरणामध्ये जवळपास अडीचशे मिळकती बाधित होणार आहेत. बाधित होणाºया खासगी मिळकतींसह सर्वे क्रमांक असलेल्या मिळकतींची मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी सर्व मिळकतधारकांना पालिका आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडून नोटीसा देण्यात आल्या होत्या. यासोबतच या संपुर्ण रस्त्यासह आजुबाजूच्या परिसरामध्ये फलकही लावण्यात आलेले होते. सोमवारी ही मोजणी होणार अशा नोटीसा देण्यात आलेल्या होत्या. परंतू, सोमवारी भूमी अभिलेखच्या अधिकाºयांनी या सर्व परिसराची पाहणी केली. येत्या गुरुवार-शुक्रवारपासून प्रत्यक्ष संयुक्त मोजणीला सुरुवात केली जाणार आहे. या मोजणीला आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. तारीख बदलण्यात आल्याची माहिती मिळकतधारक व रहिवाशांना कळविण्यात येणार असून तसे फलकही या परिसरात लावले जाणार आहेत. सर्वे क्रमांक पडलेल्या हद्दींसह बाधित होणाºया मिळकतींची मोजणी केली जाणार आहे. ====टीडीआरसाठी होणार नागरिकांना फायदाबाधित झालेल्या जमिनींच्या टीडीआर स्वरुपातील मोबदल्यासाठी नागरिक जेव्हा प्रकरणे पालिकेकडे सादर करतील तेव्हा त्यांना पुन्हा नव्याने मोजणी करुन घेण्याची आवश्यकता भासणार नाही. हीच मोजणी ग्राह्य धरुन टीडीआरची प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे नागरिकांना या मोजणीचा फायदाच होणार आहे. ====रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणाºया मिळकती         - २५०एकूण बाधित होणारे क्षेत्र                    - २ लाख ८८ हजार चौरस मीटरभूमी अभिलेखकडे पालिकेने भरलेली रक्कम            - २ लाख ५० हजार रुपये

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजkondhvaकोंढवाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका