शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

खराडी बीआरटी मार्गातील अपघातप्रकरणी विमानतळ पोलिसांकडून चालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 16:29 IST

१९ आॅक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील खराडी बी. आर. टी. मार्गावर अपघात घडला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देअपघात १९ आॅक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडला खराडी बी. आर. टी. मार्गावरदोघांना जखमी अवस्थेत टाकून आरोपी वाहनासह झाला होता पसार

पुणे : भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात १९ आॅक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील खराडी बी. आर. टी. मार्गावर घडला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत खुशाल कपाले (रा. जाधववाडी, चिखली, भोसरी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चालक गौरव दीपचंद जैन (रा. लॅण्डमार्क गार्डन, कल्याणीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत वारे (वय २२, रा. जाधववाडी, चिखली, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारे आणि कपाले एकाच दुचाकीवरुन बीआरटी मार्गामधून जात होते. त्यावेळी आरोपी जैन चालवीत असलेल्या भरधाव मोटारीची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने कपाले यांचा जागीच मृत्यू झाला. तर वारे गंभीर जखमी झाले. या दोघांना जखमी अवस्थेत टाकून आरोपी वाहनासह पसार झाला होता. वारे यांना उपचारांसाठी नांदेड जिल्ह्यात मूळ गावी नेण्यात आले होते. खासगी रुग्णालयात उपचार घेऊन परत आल्यानंतर त्यांनी याबाबत फिर्याद दिली. पुढील तपास उपनिरीक्षक ए. एम. आठरे करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातCrimeगुन्हाPoliceपोलिस