शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

राज ठाकरेंच्या विरोधात पिंपरीतील वाकड पोलिसात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 14:01 IST

राज ठाकरेंच्या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची संभावना तक्रारीत नमूद

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई येथे शिवाजी पार्क मैदानावर मेळावा झाला. या मैदानात लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी राज यांनी मशिदीवरील भोंगे आणि माहीम येथील अनधिकृत मजार यावर भाष्य केले. त्यानंतर आज राज ठाकरेंवर समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पिंपरीतील वाकड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वाजीद राजाक सय्यद नावाच्या एका व्यक्तिने ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुढीपाडवानिमित्त आयोजित पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप केला आहे. मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याची दुखावल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात येत आहे. त्यांच्या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची संभावना असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

राजधानी मुंबईच्या माहिम भागातील समुद्रात असलेल्या कथित मजारीवरून आता रणकंदन पेटण्याची चिन्हे आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात माहिममध्ये अनाधिकृत बांधकाम होत असल्याचा दावा करत थेट ड्रोन फुटेजच गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत दाखवले. हे फुटेज दाखवल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका, सरकार आणि पोलीस प्रशासनाला इशारा देत महिनाभरात याठिकाणच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाही तर त्याचशेजारी मोठे गणपती मंदिर बांधू असा इशारा दिला. तसेच  मशिदीवरील भोंगे यांचा मुद्दाही ठाकरे रोखून धरला होता. 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारणHinduहिंदूMuslimमुस्लीम