शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

३ वर्षात पावणे चौदा लाखांवर डल्ला; गृहसंस्थेच्या अध्यक्षासह तिघांवर कोथरुडमध्ये गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 15:03 IST

वैयक्तिक प्रवास खर्च, वकिलाची फी, संस्थेच्या आवारातील झाडे तोडून लाकडांची विक्री करुन तब्बल १३ लाख ७७ हजार ४५८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गृहसंस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हा विशेष लेखा परीक्षकांनी दिली कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रारलेखापरीक्षक राजेश भुजबळ यांनी पोलिसांत दिली तक्रार

पुणे : वैयक्तिक प्रवास खर्च, वकिलाची फी, संस्थेच्या आवारातील झाडे तोडून लाकडांची विक्री करुन तब्बल १३ लाख ७७ हजार ४५८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गृहसंस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहकार विभागाच्या जिल्हा विशेष लेखा परीक्षकांनी या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोथरुडमधील सहजानंद सहकारी गृहरचना संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, सचिव सविता देसाई आणि खजिनदार अनिल काळे अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना २०१३ ते १५ या कालावधीत घडली. सहकार विभागाने केलेल्या लेखापरीक्षणातून हा अपहार उघड झाला. त्यावरुन लेखापरीक्षक राजेश भुजबळ यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष कुलकर्णी आणि सचिव देसाई यांनी वकीलाच्या फी पोटी ४ लाख ७० हजार ९४० रुपयांचा अपहार केला असून, त्यांनी वैयक्तिक प्रवास खर्चापोटी संस्थेच्या खात्यातून ५७ हजार २५० रुपये काढले. तसेच पीएमसी न्यायालयात जामिनाकरीता प्रत्येकी ५ हजार असे दहा हजार रुपये काढले. या शिवाय प्रवास खर्चापोटी ४०० रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संस्थेच्या आवारातील पालवी बागेतील १० मोठी झाडे बेकायदेशीररित्या तोडण्यात आली. त्याचे १० हजार ३९६ किलो लाकडाची विक्री करुन संस्थेच्या ३ लाख ६३ हजार ९६८ रुपये रक्कमेचा कुलकर्णी, देसाई आणि काळे यांनी अपहार केला.संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षण शुल्कातही अनियमितता दिसून येत आहे. वैधानिक लेखापरीक्षणाची तीन वर्षांची फी २२ हजार १६ रुपये असता तिघा आरोपींनी पोटी व्ही. एम. मठकरी अ‍ॅण्ड कंपनीला १ लाख ६५ हजार ७७४ रुपये दिले. त्यामुळे संस्थेचे १ लाख ४३ हजार ७५८ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. काळे यांनी त्यांच्या मुलीच्या नावे काम दाखवून मानधनापोटी ४८ हजार ३०६ रुपये संस्थेच्या खात्यातून काढले. किरकोळ खर्चापोटी तीन वर्षांत १ लाख १२ हजार ३६ रुपयांचे नुकसान केले. काळे व देसाई यांनी संस्थेच्या खात्यातून प्रत्येकी १५ हजार रुपये नियमबाह्यपणे काढले. या शिवाय २०१५-१६च्या ताळेबंदात १ लाख ३२ हजार ४३० रुपयांची बोगस देणी दाखवून संस्थेतील सभासदांची अर्थिक फसवणूक केली. असा एकूण १३ लाख ७७ हजार ४५८ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :kothrud policeकोथरूड पोलीसkothrudकोथरूडPuneपुणे