Jadhav's five-day police custody for six women illegal miscarriage | सहा महिलांचा बेकायदेशीर गर्भपात करणाºया सांगोल्यातील जाधवर दांम्पत्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी
सहा महिलांचा बेकायदेशीर गर्भपात करणाºया सांगोल्यातील जाधवर दांम्पत्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठळक मुद्देसांगोला शहरातील कडलास नाक्यावरील डॉ. सुहास जाधवर व डॉ. अश्विनी जाधवर यांचे न्यू धनश्री हॉस्पिटल व मॅटर्निटी होम आहेसहा महिला रुग्णांचे गर्भपात व त्यामध्ये तीन एमटीपी व तीन आययुडी केल्याचे दिसून आले. डॉ. जाधवर दाम्पत्यांनी यापूर्वीही पीसीपीएनडीटीपी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सांगोला न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावून  हॉस्पिटलचा परवाना रद्द केला होता


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सांगोला दि ९  : येथील न्यू धनश्री हॉस्पिटल व मॅटर्निटी होममध्ये  बेकायदेशीररित्या ६ महिलांचे गर्भपात करून विल्हेवाट लावल्याप्रकरणी अटकेत असलेले डॉ. सुहास जाधवर व डॉ. अश्विनी जाधवर या दांपत्याला  न्यायाधीश आर. बी. खंदारे यांनी त्यांना सोमवार दि. १२ फेब्रुवारीपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सांगोला शहरातील कडलास नाक्यावरील डॉ. सुहास जाधवर व डॉ. अश्विनी जाधवर यांचे न्यू धनश्री हॉस्पिटल व मॅटर्निटी होम आहे. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमेध अंधुरकर यांच्या आदेशानुसार सांगोला ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक संदीप बेलपत्रे यांच्यासह    विधी समुपदेशक अ‍ॅड. रामेश्वरी माने, सिव्हिल हॉस्पिटल कक्षसेवक हनिफ शेख, नायब तहसीलदार बाळासाहेब बागडे, सपोनि अमोल कादबाने, मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, नगरपालिका विद्युत अभियंता अभिजित ताम्हाणे, गावकामगार तलाठी हरिचंद्र जाधव यांनी  न्यू धनश्री हॉस्पिटलवर छापा टाकला.  हॉस्पिटलमधील कागदपत्रांची तपासणी केली असता शस्त्रक्रिया गृह नोंद वहीमध्ये एप्रिल २०१७ ते बुधवार ७  फेब्रुवारी २०१८ पर्यंत एकूण सहा महिला रुग्णांचे गर्भपात व त्यामध्ये तीन एमटीपी व तीन आययुडी केल्याचे दिसून आले. 
याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विलास साळुंखे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. जे. एन. पाटील, अ‍ॅड. सत्यवान लेंडवे, अ‍ॅड. सचिन पाटकूलकर, अ‍ॅड. राजेश्वरी केदार यांनी काम पाहिले.  
------------------
यापूर्वी दोन वर्षांची शिक्षा
- डॉ. जाधवर दाम्पत्यांनी यापूर्वीही पीसीपीएनडीटीपी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सांगोला न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावून  हॉस्पिटलचा परवाना रद्द केला होता. असे असतानाही डॉ. जाधवर दाम्पत्यांनी त्याच जागेवर न्यू धनश्री हॉस्पिटल या नावाने मान्यता घेऊन वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता.


Web Title: Jadhav's five-day police custody for six women illegal miscarriage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.