शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचा बनाव करणारा फिर्यादीच निघाला चोर,पोलिसांनी मुंबईतून तिघांना केली अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:22 IST

बालेवाडी स्टेडियम जवळ आल्यानंतर चाकूचा धाक दाखवून आपल्याकडील सोने चोरले असल्याचा बनाव आरोपीने केला. हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याने फिर्याद दाखल केली.पोलिसांनी फिर्यादीकडे कसून चौकशी केली असता त्यानेच हा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले.

ठळक मुद्देपुण्यातील सराफी व्यावसायिकाची सव्वा कोटीची सोन्याची बिस्किटे पळविली असे फिर्यादीत नमूद ४ किलो ९०० ग्रॅम सोने जप्त

पिंपरी : मुंबईतील जव्हेरी बाजारातून आणलेली पुण्यातील सराफी व्यावसायिकाची सव्वा कोटीची सोन्याची बिस्किटे अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून पळविली असा बनाव करणारा पुण्यातील सराफी व्यावसायिकाकडे काम करणारा डिलिव्हरी बॉयने चोरी केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. १ कोटी ३५ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज त्याने पळविला असल्याचे उघडकीस आले आहे. हिंजवडी पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला असून तिघांना मुंबईतून अटक केली आहे. पोलिसांनी फिर्यादीकडे कसून चौकशी केली असता त्यानेच हा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून आरोपीचे मित्र आणि नातेवाईकांकडून चार किलो ९०० ग्रॅम सोने जप्त केले. या प्रकरणी फिर्यादी आणि आरोपी डिलिव्हरी बॉय बेहराराम शांताराम पुरोहित (वय ३१,रा. टिंबर मार्केट, पुणे, मूळ रा. सिल्दर, जि. सिरोही, राजस्थान) याच्यासह तिघांना अटक केली आहे.  बेहराराम पुरोहित पुण्याच्या रविवार पेठेतील समृद्धी ज्वेलर्स दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. मालक अरविंद सरेमल चोप्रा यांच्या सांगण्यावरून पुरोहित मुंबई मधील जव्हेरी बाजारातून अरिहंत ज्वेलर्स आणि नम्रता ज्वेलर्स या दुकानांमधून १०० ग्रॅम वजनाची २५ बिस्किटे घेऊन पुण्याकडे निघाला. मात्र, त्याने सोन्याची बिस्किटे पुण्याकडे न आणता मुंबईतच नातेवाईक व मित्रांकडे ठेवली. पुण्यात बालेवाडी स्टेडियम जवळ आल्यानंतर चाकूचा धाक दाखवून आपल्याकडील सोने चोरले असल्याचा बनाव त्याने केला. तशी त्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. घटना घडल्यानंतर फिर्याद दाखल करण्यासाठी त्याला झालेला विलंब लक्षात घेऊन पोलिसांना त्याचा संशय आला होता. माहिती योग्य प्रकारे देत नसल्याने पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यानेच सोने मुंबई येथे आपल्या मित्र व नातेवाईकांकडे लपवून ठेवले असल्याचे कबूल केले. युनिट एकचे एक पथक तातडीने मुंबईकडे रवाना झाले. या पथकाने मुंबईमध्ये राहणाऱ्या पुरोहितच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा शोध घेऊन लपवून ठेवलेले ४ किलो ९०० ग्रॅम सोने जप्त केले. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांच्या पथकाने केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हाGoldसोनंPoliceपोलिसMumbaiमुंबई