शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘राजगुरुनगर’ अत्याचार प्रकरणात कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची नुकसान भरपाई

By नम्रता फडणीस | Updated: January 7, 2025 18:11 IST

पीडित व त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार

 पुणे : राजगुरूनगर येथे खाऊ देण्याच्या आमिषाने अत्याचाराला बळी पडलेल्या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांना मनोधैर्य योजनेंतर्गत प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. सोनल पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.लैंगिक अत्याचार, बलात्कार व ॲसिड हल्ल्यातील पीडितांना मनोधैर्य योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत राज्य सरकारने वाढ केली आहे. त्यानुसार, आता पीडित व त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. याबाबत महिला व बालविकास विभागाने गुरुवारी सुधारित शासन निर्णय काढला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेत राजगुरूनगर येथील बलात्कार व हत्येच्या गुन्ह्यात बळी पडलेल्या मुलींच्या कुटुंबांना प्रत्येक दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई घोषित केली.बलात्कार, लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ल्यातील पीडित मुला-मुलींसाठी मनोधैर्य योजनेतून मदत दिली जाते. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम २ (आ) अंतर्गत मनोधैर्य योजनेतून पीडित बालकाचे पुनर्वसन केले जाते. त्याचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला सावरण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेच्या अंमलबजावणी समितीने राजगुरूनगर येथे अत्याचाराला बळी पडलेल्या दोन्ही मुलींच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत आर्थिक मदतीची व्याप्ती वाढल्यानंतर पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने पाठपुरावा करून पीडित कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र