शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो...तुमच्या कर्तव्याची तुलना युद्धभूमीशीच: डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडून कौतुकाची थाप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 19:02 IST

आपण सर्व जण एक कुटुंब आहोत. सध्याच्या कठीण काळात आपली संघभावना, सचोटीव सेवाभावी वृत्ती ही सर्व प्रकारच्या आव्हानांवर मात करण्यात यशस्वी होईल.

ठळक मुद्देपत्राद्वारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवकर्तव्यापुढे आपल्या जीवाची पर्वा न करता पोलिस देत आहेत खंबीरपणे लढा

पुणे : गेल्या सव्वा महिन्यांपासून कोरोना विरुद्धच्या या लढाईत रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त डॉ.के़. व्यंकटेशम यांनी एक भावनिक साद घालणारे पत्र लिहिले असून त्यात त्यांनी ज्या सेवाभावी वृत्तीने आपले कर्तव्य बजावत आहात याची तुलना युद्धभूमीशीच करावी लागेल, अशा शब्दात गौरव केला आहे. इतर वेळी पोलिसांच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या जनतेने कोरोनाविरुद्धच्या लढाईतील कामाचे तोंड भरुन कौतुक केले आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या या कामगिरीचा पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी खुले पत्र देऊन त्यांच्यातील आत्मविश्वासाला अधिक बळ दिले आहे.

या पत्रात पोलीस आयुक्त म्हणतात....नमस्कार, माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो....पोलिस दलाचा खरा कणा असलेले तुम्ही सर्व जण ज्या धीराने सध्या कर्तव्य बजावत आहात, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शब्द कमी पडत आहेत. गेला सव्वा महिना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिस म्हणून आपण कर्तव्य पार पाडत आहात. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करताना नाक्या-नाक्यावर , चेकिंग पाईंटवर , वाड्या वस्त्यांमध्ये जावून उन्हातान्हाची तमा न बाळगता रात्रंदिवस ज्या कर्तव्यभावनेने आणि सेवाभावी वृत्तीने आपले कर्तव्य बजावत आहेत, त्याची तुलना युद्धभूमीशीच करावी लागेल. आपण आपले कर्तव्य पार पाडत असताना, योग्य ती काळजी घ्यायला हवी. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळायला हवेत. कर्तव्यावर वारंवार मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला हवा. पुढील काही काळ आपण ही गोष्ट पोलिस दलातील शिस्तीप्रमाणेच न विसरता अंमलात आणायवयाची आहे, हे आपल्या सर्वांना नम्र आवाहन....

आपण सर्व जण एक कुटुंब आहोत. सध्याच्या कठीण काळात आपली संघभावना, सचोटीव सेवाभावी वृत्ती ही सर्व प्रकारच्या आव्हानांवर मात करण्यात यशस्वी होईल.सुरक्षा साधनांचा उपयोग करून स्वत:ची व आपल्या समाजाची काळजी घेऊन तोरोगमुक्त, भयमुक्त कसा राहील यासाठी प्रयत्न करुयात, असे आवाहन त्यांनी पोलिस सहकाऱ्यांना केले आहे. दिवसाची रात्री अन रात्रीचा दिवस करत पोलिस अधिकारी व कर्मचारी कोरोनाच्या संकटात रस्त्यावर उभे आहेत. दिवसेंदिवस शहरात कोरोनाचाप्रादुर्भाव वाढतो आहे. पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तरी देखील कर्तव्यापुढे आपल्या जीवाची पर्वा न करता पोलिस खंबीरपणे लढा देत आहेत............खऱ्या अर्थाने समाजसेवा करायची वेळआपल्यापैकी बऱ्याच जणांना नोकरीला लागताना मुलाखतीच्या वेळी तुम्ही पोलिस दलात का सहभागी होणार आहात असा विचारलेला प्रश्न तुम्हाला आठवत असेल, त्याचे सरधोपट उत्तर मला समाजाची सेवा करायची आहे असे दिलेले आठवत असेल.त्याच उत्तराला आता जागण्याची वेळ आता आली आहे. असे आयुक्तांनी या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस