शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

इथेनॉल उचलण्यास कंपन्या उदासीन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 14:45 IST

इथेनॉल निर्मितीला चांगला वाव असतानाही आॅईल कंपन्यांकडून त्याकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे साखर क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. 

ठळक मुद्देअवघ्या साडेपाच कोटींची उचल : ऊसगाळप हंगाम भरात असताना ही स्थितीसाखर हंगाम ऐन भरात असताना इथेनॉलची उचल होणे आवश्यक

पुणे : आॅईल कंपन्यांकडून इथेनॉलचा पुरवठा करण्याबाबत कोट्यवधीचा कोटा राज्याला मंजूर झाला आहे. मात्र, आॅईल कंपन्यांकडून इथेनॉलची उचलच होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्याला ४३.७ कोटी लिटरची पर्चेस आॅर्डर मिळालेली असताना अवघ्या साडेपाच कोटी लिटर इथेनॉलची उचल कंपन्यांकडून करण्यात आली आहे. देशपातळीवर यंदा उसाचे भरघोस उत्पादन झाले आहे. त्यामुळे इथेनॉलचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी चांगली स्थिती आहे. राज्यात २२ मार्चअखेरीस ८७५.९२ लाख टन ऊसगाळपातून ९७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. आॅईल कंपन्यांनी ३१३.५७ कोटी लिटरच्या खरेदीची निविदा प्रसिद्ध केली. त्यानंतर निवादा अंतिम होण्यात आणि इथेनॉल उत्पादकांना खरेदी मागणी आणि पुरवठ्यासंबंधीचे राज्य उत्पादनशुल्कची परवानगी घेण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागला. परिणामी, राज्यातील उत्पादकांना ४३.३७ कोटी लिटर इथेनॉलपुरवठा करण्याची पर्चेस आॅर्डर मिळाली. गेल्या ३ महिन्यांत आॅईल कंपन्यांनी ११ कोटी लिटर इथेनॉलची उचल करणे आवश्यक होते; पण २६ फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत केवळ ५.४६ कोटी लिटरचीच उचल केली. आॅईल कंपन्यांच्या सर्व डेपोंवर इथेनॉलचे टँकर रिकामे होण्यास तब्बल ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागत आहे.आॅईल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीबाबत उदासीनता असल्याचे दिसून येते. साखर हंगाम ऐन भरात असताना इथेनॉलची उचल होणे आवश्यक असते. याच काळात इथेनॉल उचलण्यास विलंब केला जात असल्याचे राज्य सहकारी साखर संघातील सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी २०१६-१७ या हंगामात राज्यात अवघे ३७३.१३ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यामुळे मळीच्या उत्पादनात घट झाली होती. तसेच, त्या वेळी आॅईल कंपन्यांनीदेखील इथेनॉलचा दर ३९ रुपये प्रतिलिटर जाहीर केला होता. त्यामुळे गेल्या हंगामात अवघ्या ८.३४ कोटी लिटरच्या निविदा अंतिम झाल्या होत्या. परिणामी, गेल्या हंगामात २०१५-१६च्या तुलनेत अवघा २० टक्के कोटाच भरला गेला होता. यंदा इथेनॉलचा दर ४०.८५ रुपये प्रतिलिटर इतका असून, इथेनॉलवरील स्थानिक संस्था कर व अबकारी कर रद्द झालेला आहे. तसेच, या हंगामात सुमारे साडेनऊशे लाख टनांवर ऊसगाळपाचा अंदाज आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीला चांगला वाव असतानाही आॅईल कंपन्यांकडून त्याकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे साखर क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने