शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

जातीयवादी " राष्ट्रवादी " ची अस्तित्वासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 19:58 IST

छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणारा हा पक्ष नावात राष्ट्रवाद असून छुपा जातीयवादी आहे.

ठळक मुद्देस्वराज्य स्थापनेसाठी मोलाची कामगिरी बजावलेल्या शेकडो सरदार घराण्यांच्या वंशजांचा मेळावा

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीयवादी पक्ष आहे. एकेकाळी राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला हा पक्ष आता स्थानिक पातळीवर आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणारा हा पक्ष नावात राष्ट्रवाद असून छुपा जातीयवादी आहे, असा घणाघात महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत स्वराज्य स्थापनेसाठी मोलाची कामगिरी बजावलेल्या पुण्यातील शेकडो सरदार घराण्यांचा वंशजांचा कोथरूड येथे मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात सरदार घराण्यांनी पुणे शहर लोकसभा मतदार संघातून गिरीश बापट तसेच बारामती मतदार संघातून कांचन कुल यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दर्शविला. बापट म्हणाले की, छत्रपतींचा आदर्श घेऊन सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षात प्रयत्न केले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात मी कधीच भेदभाव केला नाही. म्हणूनच अठरा पगड जातीचे वर्चस्व असणाºया कसबा मतदार संघातून ५ वेळा मी निवडून येऊ शकलो. ज्या सरदारांनी स्वराज्याच्या स्थापनेत योगदान दिले त्यांचे नाव घेताना सुद्धा ऊर अभिमानाने भरून येतो, असेही बापट यावेळी म्हणाले.बापट म्हणाले की, छत्रपतीं शिवाजी महाराजांनी जात, पात, धर्म, वंश अशा कोणत्याच भेदभावाला थारा न देता स्वराज्यातून सुशासनाचा आदर्श मांडला.  परंतु, विरोधक शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जातीय राजकारण करत आहे. छत्रपतींच्या नावाने जातीचे राजकारण म्हणजे त्यांच्याच विचारांशी प्रतारणा करण्यासारखे आहे आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यांना आम्ही आदर्श मानतो. याचा त्यांना मात्र त्रास होतो. शिवाजी महाराजांचे नाव आम्ही घेतल्यावर यांच्या पोटात का दुखते? असा सवाल ही बापट यांनी उपस्थित केला.     या मेळाव्यात माजी खासदार प्रदीप रावत, माजी आमदार रंजना कुल,  शरद ढमाले, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक सुशील मेंगडे, दिलीप वेडे पाटील, दीपक पोटे, अल्पना वरपे, सुनील मारणे, छाया मारणे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९girish bapatगिरीष बापटNCPराष्ट्रवादी काँग्रेस