शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी संचार विश्रामगृह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 13:34 IST

कर्मचाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांना याचा लाभ होणार

ठळक मुद्देपोलीस महासंचालकांच्या हस्ते उद्घाटन : वातानुकूलित सुविधा निवासादरम्यान अनुदानित तत्त्वावर अल्पदरामध्ये उपाहारगृहाची सोय उपलब्ध असणार शासकीय, शैक्षणिक, वैद्यकीय या कामांसाठी पुणे येथे आल्यावर या विश्रामगृहाचा उपयोग

पुणे : पुणे शहरात प्रशिक्षण शासकीय कामकाज, शैक्षणिक व वैद्यकीय कामासाठी राज्यभरातून येणाºया पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाषाण रोडवरील पोलीस बिनतारी संदेश मुख्यालयात अत्याधुनिक वातानुकूलित संचार विश्रामगृहाची उभारणी करण्यात आली आहे़. या संचार विश्रामगृहाचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले़.   यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम, अपर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अतुलचंद्र कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई, तसेच पोलीस दलातील विविध घटकांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस बिनतारी संदेश रितेशकुमार यांच्या संकल्पनेतून या विश्रामगृहाच्या नूतन वास्तूची उभारणी करण्यात आली आहे.  अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शासकीय, शैक्षणिक, वैद्यकीय या कामांसाठी पुणे येथे आल्यावर या विश्रामगृहाचा उपयोग होणार आहे. कर्मचाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांना याचा लाभ होणार आहे. अत्यंत कमी कालावधीत विश्रामगृह उभारण्यात आले आहे. पोलीस कल्याण योजनेअंतर्गत हे विश्रामगृह बांधण्यात आले असून ते वातानुकूलित आहे. यामध्ये एकूण ३० कक्ष आहेत. येथे निवासादरम्यान अनुदानित तत्त्वावर अल्पदरामध्ये उपाहारगृहाची सोय उपलब्ध असणार आहे. याचा लाभ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस संशोधन केंद्र, पुणे ग्रामीण मुख्यालय, यशदा या घटकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील घेता येणार आहे........अल्पदरात विश्रामगृहाची सोयराज्यभरातून विविध कामांसाठी पुण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असते़ पुण्यात राहण्याची सोय करण्यात त्यांना अनेक अडचणी येतात. अशावेळी या विश्रामगृहामुळे अल्पदरात येथे सोय उपलब्ध होणार आहे़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसMedicalवैद्यकीयGovernmentसरकारFamilyपरिवार