शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या रुग्णालयातील किडनी रॅकेटच्या चौकशीसाठी समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 05:44 IST

अवयव प्रत्यारोपणातील तज्ज्ञांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या वर्षी राज्यभर गाजलेल्या पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमधील अवैध किडनी रॅकेट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमली आहे. या समितीच्या अधयक्षपदी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रकांत भडंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अवयव प्रत्यारोपणातील तज्ज्ञांचाही असेल. तीन महिन्यांत या समितीने अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.

चौकशी समिती सर्व आरोपांची सखोल चौकशी करून त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणार आहे. तसेच, चौकशीदरम्यान काही अनियमितता आढळून आल्यास त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांची शिफारसही समिती करणार आहे. संबधितांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारसही समिती करेल तसेच भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून उपाययोजनाही समिती सुचवेल.

प्रकरण काय?

सारिका सुतार या महिलेला पैशांचे आमिष दाखवून २४ मार्च २०२२ रोजी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यासाठी तिच्याकडून ज्याने किडनी घेतली त्या आरोपीने बनावट कागदपत्रे प्रत्यारोपण समितीकडे सादर करून परवानगी घेतली होती. सुतार यांना पैसे न मिळाल्याने फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अवैध किडनी प्रत्यारोपणाबाबत संबंधित रुबी हॉल क्लिनिकचा सहभाग आहे किंवा कसे याची चौकशी होईल.

समितीत कोण कोण?पुण्याचे अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया, वैद्यकीय शिक्षण व संशोधन माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, बॉम्बे हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ.श्रीरंग बच्चू, ग्लोबल हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ.भरत शाह, नेफ्रोलॉजिस्ट डॉ.अरुण तिरलापूर, क्रिटिकेअर रुग्णालयातील प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ.वत्सला त्रिवेदी, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा विभागाचे आरोग्य सेवा सहायक संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालयातील विधी सल्लागार भाग्यश्री रंगारी तसेच या समितीचे सदस्य सचिव म्हणून आरोग्य सेवा संचालक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसCourtन्यायालय