शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तसाहेब! आता पुणेकरांचीही थाप मिळवा

By admin | Updated: June 26, 2015 04:27 IST

सगळे कसे मस्तच आहे, पण म्हटले भर रस्त्यात काम करणाऱ्या, फिरणाऱ्या पोरी-बायांचीही अडचण आपल्या कानावर घालावी. झोपडपट्ट्यांत इतकी स्वच्छतागृहे

आयुक्तसाहेब, म्हणे आपण दिल्लीत जाऊन वाहवा मिळवली. झोपडपट्ट्यांतून स्वच्छतागृहाचा यशस्वी प्रयोग करून खुद्द पंतप्रधानांकडून पाठ थोपटवून घेतली. वा!वा! आनंदच आहे आम्हालाही. नाहीतर झोपडपट्ट्यांच्या आसपासही फिरायचं म्हणजे नाकाला रूमाल आलाच...पायाखालची जमीन शोधत शोधत रस्ता पार करायची नौबत ठरलेलीच. पण तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये जगणाऱ्यांच्या पोटात उठणाऱ्या वादळाचीच नव्हे, तर या वादळाने होणाऱ्या गलिच्छतेला पाहून इतरांच्या पोटात येणाऱ्या गोळ्याचीही काळजी घेण्याचा विचार केला. यासाठी तुम्ही तिथे म्हणे ६० हजार वैयक्तिक स्वच्छतागृहे उभारली. इतकेच काय तर पुणे महापालिकेचा हा आदर्श देशातील प्रत्येक शहराने घ्यावा यासाठी केंद्र शासनाने पत्रकेही छापलीत म्हणे. अगदीच बेस्ट झाले बुवा. सगळे कसे मस्तच आहे, पण म्हटले भर रस्त्यात काम करणाऱ्या, फिरणाऱ्या पोरी-बायांचीही अडचण आपल्या कानावर घालावी. झोपडपट्ट्यांत इतकी स्वच्छतागृहे उभारलीत आणि पुण्याला अव्वल क्रमांक मिळवून दिला.. तर लगे हात आता महिलांच्याही स्वच्छतागृहांचा विचार करावा. नाही म्हणजे, तुम्ही म्हणाल महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली आहेतच. असतील ही पण माहिती किती जणींना? ती माहीत व्हावी, यासाठी काय काय केलंय अन् जी स्वच्छतागृहे नजरेस पडतात त्यांची तरी अवस्था पाहिलीये का? पुण्यातील बहुतेक स्वच्छतागृहे ही अस्वच्छतागृहेच आहेत, याचा प्रत्यक्ष पाहणी व अनुभव घेत ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. कुठे पाणी नाही तर कुठे घाणीचे साम्राज्य. कुठे कचराच तर कुठे दारूच्या बाटल्या. इतकी दुर्गंधीने की ओकारी व्हावी या पाहणीत तर आणखी एक आगळीकच हाती आले. स्वच्छतागृहे बांधली की म्हणे महापालिकेचे काम झाले... पुढे त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तुमची नाही. पण महिलांच्या आरोग्यावर असे सरकारी उत्तर देणे बरे का, ते तुम्हीच सांगा. साहेब उपाय शोधला की गवसेलच!अहो, भर रस्त्यात बिचाऱ्या आमच्या अनेक बायाबापड्या पोटापाण्यासाठी बसतात. काही जणी खरेदीला येतात, तर काही जणी नोकरीसाठी घराबाहेर पडतात. पण एकदा घर किंवा कार्यालय सोडले की यांच्या आरोग्याची व्यवस्था करणारी काही सोयच नाही. दिवसदिवसभर त्या शरीराला गोठवून ठेवतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो... काही वेळा इन्फेक्शन्स होतात. काही जणी पाणीच पिण्याचे टाळतात. आता दिवसभर पाणीही प्यायचं नाही म्हटल्यावर त्यांच्या शरीराची काय अवस्था होत असेल? तुम्ही समजूतदार आहात. तुमच्या स्वच्छतागृहाच्या कामाचे कौतुकच आहे, पण म्हटले पुण्यातल्या प्रकल्पासाठी तुम्ही दिल्लीत जाऊन पंतप्रधानांकडून पाठ थोपटवून घेतली, तर आता पुण्यात राहून पुणेकर महिलांकडूनही पाठ थोपटवून घ्या. गेल्या अनेक वर्षांपासून महिला स्वच्छतागृहांसाठी होणाऱ्या झगड्याला यंदा तुम्ही तडीसच न्या आणि हो नुसते बांधकाम उभारून नव्हे, तर त्या स्वच्छतागृहांची स्वच्छताही राहील हे पाहा. ते काम पालिकेचे नाही म्हणून हात झटकू नका.प्रशासन म्हणून तुम्ही पुढे तर या. काहीतरी उपाय शोधता येईलच. आणि आपल्याकडे जुनी म्हण आहेच, जिथे प्रश्न तिथे उत्तर. जिथे समस्या तिथे उपाय. तर मग सांगा आता महिला स्वच्छतागृहांची मोहीम कधी हातात घेताय अन् आमच्या पुणेकर महिलांची वाहवा कधी मिळवताय...