शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बैठकीला या.. नाहीतर निलंबन करण्याचा शिक्षणाधिकाऱ्यांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 20:17 IST

यशदा येथे होणाऱ्या बैठकीत प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आधी बिंदुनामावली निश्चित करावी लागणारगैरहजर राहणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाईचे स्पष्ट आदेश

पुणे : शिक्षण भरती प्रक्रियेअंतर्गत पवित्र संकेतस्थळावर सुरू असलेले काम, खासगी अनुदानित शिक्षकांचे समायोजन, आंतरजिल्हा बदल्या आदी मुद्यांवर चचेर्साठी सोमवारी (दि. ४) राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची यशदा येथे बैठक होणार आहे. या बैठकीला गैरहजर राहिल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ही बैठक बहुप्रतिक्षेतील भरती प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे महत्वाची ठरणार आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आधी बिंदुनामावली निश्चित करावी लागणार आहे. त्यासाठी पवित्र संकेतस्थळावरून हे काम केले जात आहे. मात्र, अद्यापही अपेक्षित प्रगती झालेली नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेला विलंब होत चालला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहित लागण्यापुर्वी ही प्रक्रिया पुर्ण करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. पण सध्या होत असलेल्या विलंबामुळे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यापार्श्वभुमीवर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची आज होणारी बैठक महत्वाची मानली जात आहे. ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडून आढावा घेतला जाणार आहे. यशदा येथे होणाऱ्या बैठकीत प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बैठकीत राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली, खाजगी अनुदानित शिक्षकांचे समायोजन, पवित्र पोर्टल आदी बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे. गैरहजर राहणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळी निलंबित करून त्यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई केली जावी, असे स्पष्ट आदेश अवर सचिव प्रि. शं. कांबळे यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, या बैठकीनंतर तरी भरती प्रक्रियेच्या पुर्वतयारीला वेग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही प्रक्रिया लांबल्यास आचारसंहितेपुर्वी भरती पुर्ण होणे अशक्य असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र