शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुणेकरांसाठी 'दिलासादायक' बातमी; चारचाकी वाहनांमध्ये आता मास्क वापरण्याची आवश्यकता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 16:36 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय

ठळक मुद्देप्रवासी मोटारींमध्ये मात्र वापर अनिवार्य

पुणे : शहरातील कौटुंबिक वापराच्या मोटारींमधून प्रवास करणाऱ्यांना आता मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. पालिकेने हा नियम शिथील केला असून केवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारींमध्येच मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची घटलेली संख्या लक्षात नागरिकांकडून ही मागणी केली जात होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाच्या निदेर्शांनुसार, विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पालिका आणि पोलिसांकडून एकत्रितपणे ही कारवाई केली जात असून आतापर्यंत दहा कोटींपेक्षा अधिक दंड वसुल करण्यात आला आहे. दुचाकी चालक, चारचाकी चालक, तीन चाकी आणि पादचाऱ्यांवर कारवाई होत आहे. या कारवाईला विरोध नसला तरी कारवाईमधून मोटारीला वगळावे अशी मागणी नागरिकांनी केलेली होती. मोटारीच्या काचा बंद असतात, एकाच कुटुंबातील अथवा निकटच्या संपर्कातीलच माणसे एकत्र प्रवास करीत असतात. गाडीच्या काचा बंद असल्याने त्याचा इतरांना काहीही धोका नसतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.

एकीकडे शहरात वडापाव, पाणीपुरी, चाटच्या गाड्यांसह चहाच्या टपऱ्यांवर विनामास्क गर्दी होत आहे. रेस्टॉरंट, हॉटेल आणि बारमध्ये मास्क काढूनच शेकडो नागरिक खात-पित असतात. याठिकाणी मास्क नसलेला चालतो; तर मग बंदिस्त चारचाकीमधून जाणा-या नागरिकांवरच मास्कची कारवाई का केली जात आहे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करु लागले होते. पोलिसांच्या झुंडीच्या झुंडी गाड्या अडवून दंडाची वसुली करीत असल्याने शासनाला तिजोरी भरण्यासाठी नवे  रेव्हेन्यू मॉडेल सापडल्याची टीकाही होऊ लागली होती. कोरोना काळात नागरिकांच्या नोक-या गेल्या आहेत. अनेकांना रोजगार नाहीत. त्यातच वेगवेगळ्या दंडाच्या रकमांमुळे नागरिक मेटाकुटीला आले होते.

पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही मोटारीत मास्क वापरण्याचे बंधन काढून टाकण्याबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.====एकाच कुटुंबातील व्यक्ती जर खासगी मोटारीमधून प्रवास करीत असतील तर त्यांनी मास्क लावणे अनिवार्य नाही. परंतु, प्रवासी वाहतूक करणा-या मोटारी, ओला-उबेरसारख्या मोटारींमधून प्रवास करीत असताना चालकासह सर्वांनी मास्क लावणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठकीमध्ये चर्चा झाली. नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.- मुरलीधर मोहोळ, महापौर 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसMayorमहापौरfour wheelerफोर व्हीलरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या