दिलासा... ३ हजार ३१८ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:14+5:302021-05-15T04:10:14+5:30
पुणे : शहरात शुक्रवारी कोरोनाबाधितांचा आकडा २ हजारांच्या आत आला आहे. दिवसभरात केलेल्या १३ हजार ९०८ तपासण्यांपैकी १ हजार ...

दिलासा... ३ हजार ३१८ जण कोरोनामुक्त
पुणे : शहरात शुक्रवारी कोरोनाबाधितांचा आकडा २ हजारांच्या आत आला आहे. दिवसभरात केलेल्या १३ हजार ९०८ तपासण्यांपैकी १ हजार ८३६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही १३.२० टक्के इतकी आहे़
आज दिवसभरात ३ हजार ३१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रुग्णसंख्याही आता २५ हजारांच्या आत आली आहे. सध्या शहरात २३ हजार ६९२ सक्रिय रुग्ण आहेत़
शहरात शुक्रवारी ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २४ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६६ टक्के आहे़
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ५ कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत आहे. १ हजार ३८१ रुग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २३ लाख ४० हजार २१० जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी ४ लाख ५६ हजार २९३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख २४ हजार ९९० कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ७ हजार ७११ जणांचा मृत्यू झाला आहे.