शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: 'ते' पुण्यात विमानाने यायचे, चोऱ्या करायचे अन् परत विमानाने जायचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 15:41 IST

पुणे शहरात सातत्याने घरफोड्या रोखण्यासाठी पोलीस माहिती घेत होते..!

पुणे:पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा 4 च्या कर्मचाऱ्यांनी दोन आतंरराज्य चोरट्यांना अटक केली. हे चोरटे उत्तरप्रदेशातून चोरी करण्यासाठी विमानाने पुणे शहरात यायचे. चोरी झाल्यानंतर त्यातील एक जण चोरीचा मुद्देमाल घेऊन ट्रॅव्हल्सने जायचा. तर इतर सर्व विमानाने उत्तर प्रदेशात परत जायचे. परवेज शेर मोहम्मद खान (वय 43) आणि तस्लिम अरीफ समशूल खान (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात सातत्याने घरफोड्या रोखण्यासाठी शाखेचे पोलीस माहिती घेत होते. यादरम्यान त्यांना आंतरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगार रेकी करून घरफोडीचे गुन्हे करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यातील दोन चोरटे लोहगाव येथे थांबले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. 

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरी केल्याचे कबूल केले. या चोरीतील 130 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार आहे. चोरी करण्यासाठी ते उत्तर प्रदेशातून पुण्यात विमानाने यायचे. चोरी केल्यानंतर एक जण बसने मुद्देमाल घेऊन जायचा तर दुसरा परत विमानाने जायचा. यातील दोघांवरही यापूर्वी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpune airportपुणे विमानतळtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी