शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी एकत्र यावे : मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 21:15 IST

शिक्षण, विज्ञान आणि संशोधन यांच्या समन्वयातून विद्यार्थी निर्माण करावयाचे आहेत.

ठळक मुद्देएमआयटीत छात्र संसदेचा घंटानाद 

पुणे: ‘वाढत जाणाऱ्या दहशतवादी घटनांना थोपविण्यासाठी जगातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन त्याचा नायनाट करावा लागेल. तरच जगातील सर्व नागरिक सुखी व समाधानी होतील. वसुधैव कुटुंबकमची शिकवण देणारा भारत हा संपूर्ण विश्व आपले मानतो.’असे प्रतिपादन केंद्र्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केले.भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या वतीने विज्ञान भवन नवी दिल्ली येथे २० ते २३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत १० व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या करीता कोथरूड येथील एमआयटी कॅम्पसवर लोकशाहीचा घंटानाद डॉ. निशंक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.यावेळी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड,कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू प्रा.डॉ.एन.टी.राव, प्र-कुलगुरू प्रा.डी.पी. आपटे व भारतीय छात्र संसदेचा राष्ट्रीय समन्वयक विराज कवाडिया, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्टुडंट कौन्सिलचा अध्यक्ष अविनाश टेंबे व जनरल सक्रेटरी हिमांशू चौधरी उपस्थित होते.शिक्षण, विज्ञान आणि संशोधन यांच्या समन्वयातून शिक्षण देऊन असे विद्यार्थी निर्माण करावयाचे आहेत,असे नमूद करून निशंक म्हणाले,‘आपल्या नेतृत्व गुणांच्या आधारे संकटांवर मात करतील असे विद्यार्थी घडविणे हाच केंद्र्र सरकारचा मुख्य उद्देश आहे. तरूणांनी स्वप्ने पहायला शिकावे आणि त्यांना सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करावा. भारत हा विश्व गुरू असून तो पुढेही राहणारच. त्याकरीता तरूणांचा सहभाग महत्वाचा आहे.’

टॅग्स :PuneपुणेmitएमआयटीTerrorismदहशतवादCentral Governmentकेंद्र सरकार