शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Pune | कॉलेज तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 11:35 IST

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला...

पुणे : कॉलेज तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार करणाऱ्या, फिनेल पिण्याची धमकी देत लग्न करण्यास भाग पाडणाऱ्या, चोरून काढलेले चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या एकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.

याप्रकरणी १९ वर्षीय पीडित तरुणीने तक्रार दिली. त्यावरून नागेश चव्हाण (२३, रा. आंबेगाव बुद्रुक) या तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेते. आरोपी नागेश याने तरुणीशी ओळख वाढवली. त्यानंतर प्रेमाचा बहाणा करून तिला पुणे-सातारा रस्त्यावर असलेल्या शीतल लॉजमध्ये नेले. तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत छुपे चित्रीकरण केले. छायाचित्र आणि व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी देत पुन्हा अत्याचार केला.

दरम्यान, पीडित तरुणी शिकत असलेल्या महाविद्यालयाबाहेर जाऊन तिला लग्नाची मागणी केली. तिने लग्नास नकार दिल्यानंतर त्याने मी फिनेल पिऊन जीव देईल, अशी धमकी दिली. यानंतर पीडित तरुणीला जबरदस्तीने सोलापूर येथे नेऊन तिच्याशी एका मंदिरात विवाह केला. दरम्यान, तरुणी वडिलांना भेटायचा बहाणा करून पुन्हा पुण्यात घरी राहायला आली. यानंतर आरोपीने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत नागेश विरोधात फिर्याद दिली.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी