शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन निवडणुका : परदेशी विद्यार्थी निवडणुकांपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 11:26 IST

तब्बल २५ वर्षांनंतर राज्यात विद्यापीठांत व महाविद्यालयांत खुल्या पद्धतीने विद्यार्थी निवडणुका घेतल्या जाणार आहे.

ठळक मुद्देसहभागी करून घ्यावे किंवा नाही, याबाबत चर्चा

पुणे : तब्बल २५ वर्षांनंतर राज्यात विद्यापीठांत व महाविद्यालयांत खुल्या पद्धतीने विद्यार्थी निवडणुका घेतल्या जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला या निवडणुकांमध्ये सहभागी होता येईल. मात्र, विद्यापीठांमधील विभागात व महाविद्यालयांत प्रवेशित परदेशी विद्यार्थ्यांना निवडणुकांपासून दूर ठेवले जाणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. नवीन विद्यापीठ कायद्यात खुल्या पद्धतीने निवडणुका घेण्याबाबत तरतूद केली. त्यासाठी आवश्यक नियमावली व आचारसंहिता तयार केली. त्यानुसार विद्यापीठांना निवडणुका घेण्याचे आदेश दिले. विद्यापीठांनी संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांची कार्यशाळा घेऊन निवडणुकांबाबत चर्चा केली. तसेच, गेल्या आठवड्यात विद्यापीठ निवडणुकांबाबत काम करणाऱ्या एकत्रित परिनियम समितीची बैठक पार पडली. या बैठकीत परदेशी विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे किंवा नाही, याबाबत चर्चा झाली. मतदानाचा अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच आहे. लोकसभा, विधानसभांच्या निवडणुकांमध्ये परदेशी नागरिकांना मतदान करता येत नाही. त्यानुसार परदेशी विद्यार्थ्यांनासुद्धा महाविद्यालयीन किंवा विद्यापीठीय निवडणुकांत मतदानाचा अधिकार देता येणार नाही, असा सूर या चर्चेतून निघाला.देशातील सर्वाधिक परदेशी विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विभागात व संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांना परदेशी विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र, या विद्यार्थ्यांना विद्यार्थी निवडणुकांमध्ये सहभागी होता येणार नाही. काही प्राचार्यांनी विद्यापीठ स्तरावर घेतलेल्या कार्यशाळांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयातर्फे याबाबतचे सविस्तर पत्रक काढले जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.........विद्यार्थी हा विद्यार्थीच असतो; त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना निवडणुकांपासून दूर ठेवावे किंवा नाही? याबाबत प्राचार्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे याबाबत एकत्रित परिनियम समितीच्या बैठकीत हा विषय मांडला. तसेच, सर्वांच्या शंकांचे निरसन करण्याबाबत सविस्तर परिपत्रक काढण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. कायदेविषयक अभ्यासकांनीसुद्धा याबद्दल सकारात्मकता दर्शविली.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीElectionनिवडणूकcollegeमहाविद्यालय